कोल्हापूर :सरवडेत शाँर्ट सर्किटने चप्पल दुकानाला भीषण आग!

येथील प्रसिद्ध चप्पल व्यापारी (slipper shop) पांडुरंग संपत्ती पोवार यांच्या मुख्य बाजारपेठेत असलेल्या व्यंकेटेश्वरा फूटवेअर दुकानाला शाँर्ट सर्किटने आग लागली. या आगीत सुमारे पंचवीस लाखाहून अधिक रुपयांचे नुकसान झाले. ग्रामस्थांनी जीव धोक्यात घालून आग विझविण्याचा प्रयत्न केला. तब्बल चार तासांनी आग आटोक्यात आणण्यात यश आले. शुक्रवार दुपारच्या सुमारास ही दुर्घटना झाल्याने बाजारपेठेत मोठी गर्दी झाली होती.
सरवडे बाजारपेठेत पांडुरंग पोवार यांचे चप्पलांचे दुकान (slipper shop) आहे. दुकानात पंचवीस लाखाहून अधिक किंमतीचा माल भरला होता. दुपारच्या सुमारास दुकानात अचानक शाँर्ट सर्कीटने दुकानास आग लागली. बघता बघता आगीने रूद्र रूप धारण केले. मोठ मोठे धुरांचे लोठ बाहेर येऊ लागले. तात्काळ ग्रामस्थांनी आणि व्यापाऱ्यांनी बिद्री, भोगावती, हमीदवाडा साखर कारखान्याबरोबर मुरगुड नगर परिषदेच्या अग्निशामन दलाला आगीची माहिती दिली. घटनास्थळी अग्नीशामन दलाचे बंब दाखल होत जवानांनी आग आटोक्यात आणली.
इमारतीचा स्लँब फुटला
तब्बल तीन तास मुख्य बाजारपेठेत आगीचे तांडव सुरू होते. आगीची तीव्रता इतकी होती की इमारतीचा स्लँब फुटून मोठा आवाज झाला. इमारतीच्या काचा आणि स्लँबचे तुकडे सुमारे तीस फुट अंतरावर उडून पडले.
हेही वाचा :