कोल्हापूर : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कारला भीषण अपघात!

students

भरधाव कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात हर्ष पुजारी हा महाविद्यालयीन (students) विद्यार्थी जखमी झाला. या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. बुधवारी पहाटे झालेल्या या अपघातात दैव बलवत्तर म्हणूनच हे विद्यार्थी वाचल्याची चर्चा परिसरात आहे.

बुधवारी पहाटे कारमधून लाईनबाजार मार्गे एसटी स्टँडकडे चहा पिण्यासाठी तीन महाविद्यालयीन विद्यार्थी (students) निघाले होते. सर्किट हाऊस समोर चालकाचा कारवरील ताबा सुटला. कार सर्किट हाऊसच्या भिंतीवर धडकली, पुढे कार पलटी हाेत लगतच्या बसस्टॉपवर आदळली, यानंतर कारने पेट घेतला.

Kolhapur: A terrible accident to the car of college students!

अपघात इतका भीषण होता की कारची चारही चाके तुटून पडली. कारचा चक्काचूर झाला. कारमध्ये तीन विद्यार्थी होते, एअर बॅग उघडल्यामुळे कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. अपघातानंतर कारमधील विद्यार्थ्याने आपल्या मित्राला याबाबत फोन करून माहिती दिली. विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत असल्याचे समजते. याबाबत पोलिसांत नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

हेही वाचा :


तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यासाठी काय केलं?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *