कोल्हापूर : भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांशी धक्काबुक्की!

कचरा घोटाळ्यातील दोषींवर कारवाईत होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ भाजपने आज महानगरपालिकेसमोर जोरदार निदर्शने केली. अधिकारी लवकर भेटावयास न आल्यामुळे संतप्त (bjp workers) कार्यकर्त्यांनी महापालिकेत घुसण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलिसांशी झटापट, धक्काबुक्की झाली. काही महिलांनी गेटवरून बांगड्या फेकून प्रशासनाचा निषेध केला.

जानेवारीत भाजपने कचरा घोटाळा उघडकीस आणला होता. कचरा विनाप्रक्रिया शेतांत टाकल्याचे स्पष्ट झाले. महापालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा करून ही बाब स्पष्ट केली होती. महापालिकेच्या चौकशीतही हा गैरप्रकार सिद्ध झाला. सहा महिन्यांनंतरही दोषी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर जुजबी कारवाई केली. प्रशासन त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत (bjp workers) भाजपने आज राहुल चिकोडे, महेश जाधव, अशोक देसाई, विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने केली.

चंद्रकांत घाटगे, विजय खाडे-पाटील, अजित ठाणेकर, राहुल चिकोडे आणि महेश जाधव यांनी प्रशासनावर टीका केली. अधिकारी न आल्याने, ‘आम्हाला आत जायचे नाही, अधिकाऱ्यांना बाहेर बोलवा’ अशी मागणी करूनही कोणी न आल्याने कार्यकर्त्यांनी आत घुसण्याचा प्रयत्न केला. उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या आवाहनानुसार प्रमुख पदाधिकारी आत गेल्यानंतर गेट बंद करण्याचा पोलिसांकडून प्रयत्न झाला. त्यानंतर सर्वांनी मुख्य दरवाजात ठाण मांडले.

यावेळी दिलीप मेत्राणी, गणेश देसाई, विजय आगरवाल, संतोष भिवटे, दिग्विजय कालेकर, भरत काळे, विवेक कुलकर्णी, आशिष कपडेकर, अशोक जाधव, अद्वैत सरनोबत, राहुल घाटगे, नरेश जाधव, रमेश दिवेकर, दिलीप बोंद्रे, अशोक लोहार, अतुल चव्हाण, गिरीश साळोखे, प्रकाश घाटगे, संदीप कुंभार, विशाल शिराळकर, विजय दरवान, गायत्री राउत, विद्या बनछोडे, मंगला निप्पाणीकर, सुजाता पाटील, राधिका कुलकर्णी आदी उपस्थित होते.

आरोग्य निरीक्षकाच्या बदलीचे आश्‍वासन

उपायुक्त रविकांत आडसूळ चर्चा करण्यास आल्यावर प्रदीप उलपे, राजू मोरे, संजय सावंत यांनी प्रलंबित विषयांबाबत धारेवर धरले. अधिकाऱ्यांचे निलंबन व कंत्राट समाप्ती हे विषय प्रशासकांच्या अखत्यारीतील असल्याचे सांगितल्याने प्रशासकांसोबत बैठक लावा, अशी मागणी केली. उपायुक्तांनी दोन दिवसांत बैठक ठरवू, उद्या दुपारनंतर कचरा उठाव करावयास लावू आणि निलंबनाची प्रक्रिया सुरू असलेल्या आरोग्य निरीक्षकास बावड्यातून बदली करू, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित केले.

हेही वाचा :


भाजपकडून शिंदे गटाला मोठी ऑफर!

Leave a Reply

Your email address will not be published.