कोल्हापुरात पुन्हा एकदा त्याची दहशत

कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा गव्यांनी (Bison) दहशत माजवली आहे. आज सकाळी पन्हाळ्याच्या (Panhala) पायथ्याशी असलेल्या गोलीवडे (Goliwade) गावात गव्यांचा कळप नागरीकांना (citizens) दिसला आहे.
आज सकाळी गव्यांचा एक कळप गोलीवडे गावात घुसला. हा कळप गावात घुसताच त्यांना हकलवण्यासाठी नागरीकांनी मोठी गर्दी केली.या गव्यांनी शेतीचे नुकसान केले आहे. गव्यांच्या दहशतीमुळे नागरीक त्रस्त आहेत. गव्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून गव्यांचा कळप कोल्हापूर जिल्ह्यात धूमाकूळ घालत आहे. काही दिवसापूर्वी गव्याच्या हल्ल्यात एका तरूणाला हाकनाक जीव गमवावा लागला आहे. काही जणांना गव्यांनी जखमी केले होते.
काही वर्षापूर्वी एका माध्यम प्रतिनीधीचा या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली होती. सतत येणाऱ्या गव्यांच्या कळपांमुळे नागरीकांच्यात (citizens) भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच गव्यांचा वाढता मानवीवस्तीत हस्तक्षेप चिंतेचा विषय बनला आहे.
हेही वाचा :