कोल्हापूरचे वातावरण तापले…

कोल्हापूर शहरासह जिल्हा बुधवारी चांगलाच तापला. अवघ्या तीन दिवसांत पार्याने तीन अंशांनी उसळी घेतली. यामुळे यावर्षी प्रथमच कमाल तापमान (climate) 39 अंशांपर्यंत गेले. मंगळवारी पारा 36 अंशांवर होता. दरम्यान, येत्या दोन दिवसांत तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या झळा वाढत आहेत. दुुपारी तर अंगाची लाहीलाही करणार्या उन्हाचे (climate) चटके जाणवू लागले आहेत. बुधवारी त्याची तीव—ता आणखी वाढली. सकाळपासून ऊन जाणवत होते, दुपारपासून तर अंगातून घामाच्या धाराच निघत होत्या. वाढत्या उन्हाने दुपारी प्रमुख रस्त्यांवरही वर्दळ तुलनेने कमी जाणवत होती. जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पारा 36 अंशांवर होता. आज त्यात 3 अंशांनी वाढ झाली.
शहरात आज 39 अंश इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. वाढत्या उष्म्याने हैराण झालेल्या नागरिक हैराण झाले आहेत, दुपारी बागेतील झाडे, आईस्क्रीम, शीतपेये, रसवंतीगृह यांचा आसरा घेत आहेत.
हेही वाचा :