कोल्हापूरात ‘आप’चे महापालिकेसमोर ‘काहिलीत पोहून’ आंदोलन

कोल्हापूर महानगरपालिकेचे (corporation) तलाव दुरुस्त करून नागरिकांसाठी खुले करावेत. या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने आज महानगरपालिकेसमोर काहिलीत पोहून अनोखे आंदोलन करण्यात आले.लहान मुलांनी काहिलीत पोहून महापालिकेचा निषेध नोंदवला . जलतरण तलाव सुरू झालेच पाहिजेत , तलाव बंद ठेवणाऱ्या महापालिकेचा धिक्कार असो अशा घोषणांनी महापालिका परिसर दुमदुमला.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दोन वर्षापासून कोल्हापूर महानगरपालिकेचे जलतरण तलाव बंद होते . यावर्षी लाटेचा प्रभाव नसल्याने लहान मुलांसह मोठी मांडळी ही तलावात पोहण्याच्या तयारीत होते. मात्र उन्हाळ्यात महानगरपालिकेने चालवायला दिलेला टाकाळा येथील छ . शाहू जलतरण तलावाची गळती न काढल्याने तो बंद ठेवण्यात आला आहे . तसेच रंकाळा येथील अंबाई टँकची दुरुस्ती रखडल्याने तो देखील बंद अवस्थेत आहे .
शहरातील नागरिक महापालिकेकडून (corporation) सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी कर भरत असतात , परंतु अशा नादुरुस्त जलतरण तलावांमुळे नागरिकांची गैरसोय होत असून त्यांना जादा पैसे देऊन खाजगी तलावांचा आश्रय घ्यावा लागत आहे.
एकीकडे आपण ऑलिम्पिक मध्ये पदक मिळवण्याचे स्वा बघत असताना महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांना जलतरण तलावांच्या सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे . बंद तलाव त्वरित दुरुस्त करून नागरिकांसाठी खुले करावेत अशी मागणी ‘ आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी केली .
यावेळी उत्तम पाटील , संतोष घाटगे , सूरज सुर्वे , मोईन मोकाशी , अमरजा पाटील , राज कोरगावकर , विशाल वठारे , मयूर भोसले , आदम शेख , अभिजित पाटील , प्रथमेश सूर्यवंशी , अभिजित कांबळे , डॉ . कुमाजी पाटील , संभाजी सूर्यवंशी , अभिजित भोसले , भाग्यवंत डाफळे , राकेश गायकवाड , बाबुराव बाजारी , मंगेश मोहिते , राजेश खांडके , दत्तात्रय बोन्गाळे , संजय नलावडे , शकील मोमीन आदी उपस्थित होते.
हेही वाचा :