कोल्हापूर : ‘भूसंपादन’च्या तत्कालीन लिपिकासह पत्नीवर गुन्हा!

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन विभागामधील तत्कालीन लिपिक (clerk) सतीश गणपतराव सूर्यवंशी व त्यांच्या पत्नी अर्चना सतीश सूर्यवंशी यांच्याविरुद्ध गुरुवारी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. लाचलुचपत प्रतिबंध विभागातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन कुंभार यांनी सूर्यवंशी दाम्पत्याविरोधात फिर्याद दाखल केली.
सूर्यवंशी यांच्या पाचगाव येथील हाऊसिंग सोसायटीमधील श्री बंगलासह आणि मालमत्तांच्या ठिकाणी पथकाने झडती घेऊन तपासणी केली, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी आज दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन विभागात लिपिक (clerk) पदावर कार्यरत असताना सतीश सूर्यवंशी यांनी अधिकाराचा गैरवापर करून बेहिशोबी मालमत्ता केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त झाली होती. या विभागाचे पुणे विभागीय पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे यांनी पोलीस उपाधिक्षक बुधवंत आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन कुंभार यांना उघड चौकशीच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ही चौकशी प्रक्रिया सुरू होती.
चौकशीत ज्ञात उत्पन्नापेक्षा म्हणजे सरासरी 19 लाख 78 हजार 661 रुपयाची बेहिशेबी मालमत्ता असल्याचे आढळून आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन कुंभार यांनी आज (दि. 5) सकाळी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 कलमान्वये सूर्यवंशी दाम्पत्याविरोधात लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या कारवाईनंतर यांच्या बंगल्यासह अन्य ठिकाणांची झडती घेण्याची प्रक्रिया सायंकाळपर्यंत सुरू होती.
हेही वाचा :