कोल्हापूर जिल्हा सहकारी बॅंकेच्या नोकरभरतीचा मार्ग मोकळा!

ऑफलाईन पद्धतीने होणाऱ्या नोकरभरतीत हस्तक्षेप व गैरव्यवहार टाळण्यासाठी भविष्यात जिल्हा सहकारी बॅंकांमधील (district co operative bank) नोकर भरती ऑनलाईन घ्यावी, अशा सूचना शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या सहकारी संस्थांचे सहनिबंधक श्रीकृष्ण वाडेकर यांनी आज दिले आहेत. ज्या जिल्हा बॅंकां ‘अ’ प्रवर्गातील आहेत अशांना २५ पदे, ब वर्गातील बॅंकांना २१, क वर्गातील १८ व ड वर्गातील बॅंकांना १५ पदे भरता येणार आहेत. दरम्यान, यामुळे कोल्हापूर जिल्हा सहकारी बॅंकेच्या नोकरभरतीचा मार्गही मोकळा झाला आहे.

नाबार्डकडील राज्यस्तरीय कार्यबलाच्या अहवालात नमूद वरिष्ठ व्यवस्थापन, मध्य व्यवस्थापन व कनिष्ठ व्यवस्थापनातील पदे तसेच विषेश व तांत्रिक पदे, सुरक्षा रक्षक, वाहनचालक हे पद वगळता इतर सर्व पदांची भरती वगळता इतर भरती प्रक्रिया (district co operative bank) ऑनलाईन होणार आहे.

दरम्यान, जिल्हा बँकांच्या भरतीत वशिलेबाजी होऊ नये. बाहेरील लोकांचा हस्तक्षेप होवू नये, यासाठी ऑफलाईनऐवजी लेखी परीक्षा घेतल्या जाणार आहेत. ऑनलाईन भरतीसाठी अधिकृत संस्थांची व एजन्सी यांची राज्यस्तरीय तालिका व पॅनल सहकार आयुक्त व निबंधकांनी तयार करावे लागणार आहे. राज्य सहकारी बॅंक असोसिएशन व इंडियन बॅंकिंग पर्सोनेल सिलेक्‍शन (आयबीपीएस) यांसारख्या यंत्रणांचा समावेश असावा.

दरम्यान, ज्या समितीद्वारे नियुक्‍त्या केल्या जातील ती संस्था नोंदणीकृत असली पाहिजे. या संस्थेने व्यापारी बॅंका, जिल्हा मध्यवर्ती बॅंका, नागरी सहकारी बॅंका तसेच शासनातील विविध विभागांसाठी किमान तीन वेळा ऑनलाईन नोकरभरतीची प्रक्रिया केलेली असावी.

कामकाजास गती

कोल्हापूर जिल्हा बॅंकेत नोकर भरतीची गरज आहे. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांअभावी बँकेचे कामकाजाची गती कमी झाली आहे. नोकर भरतीमुळे ही गती वाढणार असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा :


राजेश क्षीरसागर एकनाथ शिंदे गटात सामील, फोटो आला समोर!

Leave a Reply

Your email address will not be published.