शाळा सिद्धी स्वयंमूल्यमापनात कोल्हापूर जिल्हा राज्यात प्रथम..!

शिक्षण विभागाने केलेल्या शाळा सिद्धी मूल्यमापनात (evaluation) कोल्हापूर जिल्ह्याने गुणवत्तेवर मोहर उमटवत पहिला क्रमांक मिळविला आहे.

शाळांची गुणवत्ता व इतर गोष्टींसाठी दरवर्षी शाळा सिद्धीच्या माध्यमातून स्वयंमूल्यमापन (evaluation) केले जाते. शाळा सिद्धी मूल्यमापनाद्वारे शाळांची श्रेणी निश्‍चित केली जाते. या श्रेणीद्वारे शाळांचा दर्जा ठरविला जातो. यात शाळांची गुणवत्ता, भौतिक सुविधा, शाळांचे अभिलेख, सहशालेय उपक्रम यासह सात मुद्द्यांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील 30 एप्रिलपर्यंत 3,668 पैकी 3,642 शाळांनी स्वयंमूल्यमापन ऑनलाईन पूर्ण केले. 26 शाळा बंद झाल्यामुळे त्यांनी माहिती स्वयंमूल्यमापन केले नाही. गुरुवारी शिक्षण विभागाने राज्याचा अहवाल जाहीर केला आहे. यात कोल्हापूर अव्वल ठरले आहे. सांगली (द्वितीय), सोलापूर (तृतीय), तर सिंधुदुर्ग (चतुर्थ), अहमदनगरने (पाचवा) क्रमांक मिळविला आहे.

सर्व माध्यम व व्यवस्थापनाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांचे, समग्र शिक्षा अभियानाचे कर्मचारी, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकारी यांनी सातत्याने केलेल्या कामामुळे हे मूल्यमापन वेळेमध्ये पूर्ण होऊ शकले. कोल्हापूर जिल्ह्याने प्रथम क्रमांक मिळविल्याचा आनंद आहे.

– एकनाथ आंबोकर,
माध्यमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद

हेही वाचा :


कोल्हापूर : नागावचा तरुण अपघातात ठार; दोघे गंभीर

Leave a Reply

Your email address will not be published.