कोल्हापूरात मतांचा टक्का वाढला; ह्यावेळी धक्का कुणाला..?

केवळ पश्चिम महाराष्ट्राचेच (Paschim Maharashtra) नव्हे, तर राज्याच्या राजकीय पटलाचे लक्ष लागून राहिलेल्या उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत (election) गेल्या निवडणुकीच्या तुलनेत या वेळी मतांचा (Voting) टक्का वाढला आहे. वाढलेला टक्का कुणाला धक्का देणार, याविषयी उत्सुकता आहे.
या मतदारसंघात सुशिक्षित, उच्चभ्रू मतदारांची संख्या मोठी असून अपेक्षित मतदान होत नसल्याचा दावा यंत्रणेचा आहे.काँग्रेस आणि भाजपनेही ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने चुरस निर्माण झाली होती. त्यातून मतांचा टक्का वाढला आहे.
या वेळी झालेल्या पोटनिवडणुकीत (election) मात्र काँग्रेससह भाजपही ताकदीने रिंगणात उतरला होता. भाजपने पूर्ण निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्यावर नेऊन ठेवली, त्याला प्रत्युत्तर देताना काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर पंचाईत होती. त्यामुळे शिवसेनेकडूनच भाजपच्या हिंदुत्वाला प्रत्युत्तर दिले गेले.
या ‘हिंदुत्व’च्या कार्डबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी तरूणांत असलेले आकर्षण, दोन्ही बाजूंनी लावलेली ताकद, शिवसेनेतील अंतर्गत नाराजी मतांचा टक्का वाढण्याची प्रमुख कारणे असल्याचे बोलले जाते.
हेही वाचा :