कोल्हापूर: गव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी..!

तारेवाडी (ता. गडहिंग्लज) येथील शेतकरी भाऊसाहेब रामू वाईंगडे, धोंडीबा परसू देसाई बुधवार सकाळी साडे आठ वाजताच्या सुमारास घटप्रभा नदीकाठावरील महारकी नावाच्या शेतामध्ये ऊसाला पाणी देण्यासाठी गेले असता त्यांच्यावर मक्याच्या शेतात लपलेल्या (cow) गवी रेड्याने अचानक हल्ला करून जखमी केले.
यामध्ये वाईंगडे यांच्या नाकाला, कमरेला तर देसाई यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली. वाईंगडे, देसाई यांच्यावर नेसरी ग्रामीण रूग्णालय प्राथमिक उपचार करून घरी सोडले. घटनेची माहिती समजताच वनरक्षक एस. एस. भंडारे व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींची विचारपूस केली.
यावेळी उपसरपंच युवराज पाटील, दादासाहेब पाटील, संजय पाटील, तेजस पाळेकर, विलास नाईक, बबन पाटील, विलास पाटील, प्रकाश पाळेकर आदी उपस्थित होते. गवा (cow) रेडा पाहण्यासाठी नागरीकांची गर्दी झाली होती. सुमारे एक तासाच्या प्रयत्नानंतर गव्याला ऊस, मका शेतातून हुसकावून लावण्यात शेतक-यांना यश आले.
गवा साडे नऊ वाजताच्या सुमारास डोंगरच्या दिशेने गेला अशी माहिती घटनास्थळी जमलेल्या शेतक-यांनी दिली. गव्याने ऊस, मका पिकांचे नुकसान केले. तारेवाडीकरांच्या शिवारात गव्याने प्रवेश केल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
हेही वाचा :