कोल्हापूर: दीड हजारांत पाच हजारांचा किराणा!

फसवणुकीच्या घटना रोज घडत आहेत. नवनव्या कंपन्या नवनवी आमिषे घेऊन बाजारात उतरत आहेत. गोरगरीब, मध्यमवर्गीय हे त्यांचे ‘टार्गेट’ ठरलेले असतात. कमी वेळात जादा परतावा किंवा कमी पैशात जादा खरेदीचे आमिष दाखवून लुबाडण्याचा धंदा सर्रास पाहायला मिळतो. अशा ठकसेनांपासून सावध राहण्याचे आवाहन अनेकदा केले जाते. तरीही फसविणार्‍यांची अन् फसवणूक होणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आता कमी पैशात जादा किराणा माल (grocery store) देण्याच्या आमिषाने महिलांची फसवणूक झाली आहे.

यासाठी काही महिला बचत गटांचा आधार घेण्यात आला आहे. फसवणुकीच्या या नव्या फंड्याची सध्या शहरात जोरात चर्चा सुरू आहे. थेट पैशाच्या आमिषाबरोबरच कमी किमतीत वाहन किंवा वस्तू देण्याच्या आमिषाने देखील अनेक लोक फसले आहेत.

महिला बचत गटामध्ये सदस्यांची संख्या अधिक असते. त्याच्या माध्यमातून महिलांना एकत्र करणे सुलभ होत असल्यामुळे एका संस्थेने काही बचत गटांना हाताशी धरून दीड हजारांत पाच हजारांचा किराणा (grocery store) हा फंडा राबविण्यास सुरुवात केली. चार पैशाची बचत होईल, या अपेक्षेने नाव नोंदणीसाठी महिलांची गर्दी होऊ लागली. नेहमीप्रमाणे सुरुवातीला काही दिवस महिलांना धान्य देण्यात आले. परंतु महिन्याच्या आतच कंपनीने आपले खरे रूप दाखविण्यास सुरुवात केली.

पैसेही तिकडे आणि किराणाही नाही यामुळे महिला संतप्त होऊ लागल्या. ज्या बचत गटांमार्फत पैसे दिले, त्या बचत गटाच्या प्रमुखांकडे महिलांनी तगादा लावण्यास सुरुवात केली. त्यांनी त्या संस्थेच्या मागे तगादा लावला. सुरुवातीला संस्थेकडून किराणा मालाची ऑर्डर देत होतो त्याच्या कुवतीपेक्षा अधिक मालाची ऑर्डर वाढल्याने त्याला वेळ लागत असल्याचे सांगण्यात येऊ लागले. त्यानंतर आजारी असल्याचे कारण देण्यात आले. महिलांचा तगादा वाढल्यानंतर कंपनीची व्यक्ती फोन बंद करून आता पसार झाली आहे.

…अशी केली महिलांची फसवणूक

आता कमी किमतीत जवळपास तिप्पट किमतीचा किराणा देण्याचे आमिष दाखविण्यात आले आहे. वाढत्या महागाईमुळे महिलांचे आर्थिक बजेट कोलमडू लागले आहे. महिन्याच्या खर्चाचा ताळमेळ बसवताना कसरत करावी लागत आहे. अशा परिस्िथतीत एक-दोन रुपये स्वस्त धान्य मिळेल तिकडे महिला जात असतात. दोन रुपयांची वस्तू एक रुपयाला मिळते म्हटल्यावर तिकडे महिला आकृष्ट होणे साहजिकच आहे. त्याचा फायदा घेत एका संस्थेने ‘दीड हजार रुपयांत पाच हजारांचा किराणा’ अशी जाहिरातबाजी करून महिलांची फसवणूक केली आहे.

हेही वाचा :


शिवसेना आपलीच हे सिद्ध करायला ठाकरे पुरावे देणार?

Leave a Reply

Your email address will not be published.