कोल्हापूर : ‘जयप्रभा’साठी सामूहिक आत्मदहन..!

96 दिवस आंदोलन करूनही जयप्रभा स्टुडिओ (studio) जागेचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. सात दिवसांत याबाबत निर्णय न झाल्यास सामूहिक आत्मदहनाचा इशारा देण्यात आला. दरम्यान, गुरुवारी कलाप्रेमींनी कावळा नाका येथे मानवी साखळी करत आंदोलन करून ठिय्या आंदोलन करण्यात आले.
जयप्रभा स्टुडिओ (studio) चित्रीकरणासाठी कायमस्वरूपी खुला व्हावा, यासाठी कावळा नाका येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी जयप्रभा स्टुडिओच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार रद्द व्हावा, चित्रीकरणासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशा मागण्या करण्यात आल्या. सनदशीर मार्गाने आंदोलन सुरू आहे. त्याकडे शासनाचे लक्ष नाही. ते वेधण्यासाठी शहरात विविध ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. यातूनही प्रश्न सुटला नाही, तर सामूहिक आत्मदहनाचा इशारा देण्यात आला. यावेळी हॉटेल व्यवसायिकांनी या आंदोलनाला पाठिंबा
दिला.
आंदोलनस्थळी संस्थेचे उपाध्यक्ष धनाजी यमकर, सुनील माने, सुनीता साखळकर, शोभा शिराळकर, राहुल राजशेखर, शैलेश शिंदे, संजय पटवर्धन, प्रफुल गवस, नितीन कुलकर्णी, व आंदोलक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
हेही वाचा :