कोल्हापूर : किरकाेळ वाद जीवावर बेतला ; चाकू हल्‍ल्या‍त तरुणाचा मृत्‍यू!

सावकार म्‍हटल्‍याच्‍या कारणावरुन झालेल्‍या भांडणातील जखमी भरत शंकर नाईक (वय २९, रा. केर्ली, करवीर) याचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. चाकूहल्‍ला करणार्‍या संदीप बापू माने (रा. सोनतळी) याला अटक आली असून, त्‍याच्‍यावर खूनाचा गुन्‍हा नोंदविण्‍यात (police report) आला. तसेच एका महिलेलाही ताब्‍यात घेण्‍यात आले आहे.

भरत नाईक हा गवंडी काम करीत होता. शुक्रवारी सोनतळी येथे पैसे मोजत असताना संशयित संदीप माने याने त्‍याला ‘सावकार’ म्‍हणून चिडवले. यातून दोघांचे भांडण झाले. रात्री दहाच्‍या सुमारास संदीप माने याने भांडण मिटविण्‍यासाठी भरतला घराजवळ बोलावले. यावेळी दोघांमध्‍ये पुन्‍हा वाद होवून झटापट झाली. यावेळी संदीपने स्‍वत:जवळील चाकूने भरतच्‍या पोटावर, मानेवर वार केले.

मानेवर वार वर्मी लागल्‍याने भरत गंभीर जखमी झाला. सीपीआरमध्‍ये उपचारादरम्‍यान शनिवारी सकाळी त्‍याचा मृत्‍यू झाला. याप्रकरणी करवीर पोलिसांनी संदीप मानेला अटक केली. न्‍यायालयाने त्‍याला २८ जूनपर्यंत पोलिस कोठडी (police report) सुनावली.

किरकाेळ वाद जीवावर बेतला
भरत नाईक हा गवंडी काम करत होता. तर संशयित संदीप माने हा सर्व्हींसिंग सेंटरवर कामाला जात होता. दोघांची कामानिमित्त मैत्री झाली शुक्रवारी भरत नाईक पैसे मोजत असताना संदीपने त्‍याला सावकार अशी हाक मारली. याच कारणावरुन वाद झाला. संदीप माने याने भांडण मिटविण्‍यासाठी भरतला घराजवळ बोलावले.

यावेळी दोघांमध्‍ये पुन्‍हा वाद होवून झटापट झाली. यावेळी संदीपने स्‍वत:जवळील चाकूने भरतवर हल्‍ला केला. भरत नाईक याच्‍या मानेवर झालेला वार अत्‍यंत वर्मी लागला. मोठ्याप्रमाणात रक्‍तस्‍त्राव होवून त्‍याची प्रकृती गंभीर बनली होती. उपचार सुरु असताना सकाळी त्‍याचा मृत्‍यू झाला. गुन्‍ह्यातील धारदार चाकू पोलिसांनी जप्‍त केला आहे.

हेही वाचा :


याला म्हणतात ट्रेलर! शमशेराचं ‘टॉलीवूड’ला आव्हान..!

Leave a Reply

Your email address will not be published.