कोल्हापुरात नाना पटोलेंचा हल्लाबोल…

politics news – महाराष्ट्रात पहाटेचं सरकार गेल्यामुळे भाजपाचा थयथयाट झाला आहे. दीड दिवसांचे गणपती असतात तसेच ते विसर्जित झाले. पण केंद्रातील भाजप सरकार मदतीने राज्यातील नेत्यांना त्रास देण्याचे प्रकार भाजपने सुरु केले आहेत. राज्यातले भाजपचे नेते कायद्याची ऐशी तैशी, विचारांची ऐशी तैशी करायला निघालेत असा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला.
कोल्हापूरमध्ये (Kolhapur Election) ते बोलत होते. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी राज्यातील दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजपमध्ये प्रतिष्ठेची लढाई होत आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांच्य नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपांनी कोल्हापूरचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कोल्हापूरमध्ये बोलताना म्हटले की, भाजपच्या कालच्या सभेतून त्यांचा हिंदूंचा अजेंडा सेट केला. निवडणुका आल्या की यांना हिंदुत्व आठवतं. मूठभर लोकांसाठीच केंद्रातील सरकार काम करते. यांच्या सभांसाठी बाहेरची लोकं आणावी लागली. पण कोल्हापूरमधील जनताच यांना धडा शिकवेल. (politics news)
धर्माच्या आणि देवाच्या नावाने आघाडी काम करत नाही. राजीव गांधी यंनी रम लल्लंची स्थापना केली. पण काँग्रेसने कधीही धर्माचा वापर केला नाही. भाजप अतिशय खालच्या स्तरावर जाऊन धर्माचा वापर करतेय. राजकारणात देवाचा वापर करणे योग्य नाही, असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं.
हेही वाचा :