‘मुख्यमंत्री म्हणून आचारसंहिता ठरवणं तुमची जबाबदारी’

kolhapur news- मुख्यमंत्र्यांनी भोंग्यांसंदर्भात बैठकीला उपस्थित न राहता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थिती दर्शवावी असा अट्टहास करणं चुकीचं आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून प्रत्येक गोष्टीत त्यांनी सहभाग घेतला पाहिजे. मुख्यमंत्री हे शिवसेनेचे नेते असण्याआधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. शिवराळ भाषेसाठी त्यांच्याकडे मोठी फौज आहे, त्यांना कामाला लावायल हरकत नाही. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काही आचारसिंहता ठरवणं ही ठाकरेंची जबाबदारी आहे, असा सल्ला भाजपाचे चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. आज ते कोल्हापुरात बोलत होते.
गृहविभागात काही आलबेल नाही या भाजपाच्या अहवालाबाबत ते म्हणाले, राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय आणि ईडीकडून चौकशी सुरु आहे. सीबीआय आणि ईडीच्या चौकशीनंतर आवश्यकता वाटल्यास चांदीवाल आयोग याची दखल घेईल. त्यामुळे केंद्रीय यंत्राणांनी याचं काय कराव हा त्यांचा अधिकार आहे. चांदीवाल आयोगाने गृह मंत्रालयाच्या कामावर ताशेरे ओढले आहेत. या सगळ्याची दखल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घ्यावी, असंही पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे हे शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. याविषयी मत विचारले असता पाटील म्हणाले, सरकारी नोकरीतून बाहेर पडल्यानंतर आलेला फटीक, कंटाळा, चिडचिड संपवून एकदा व्यक्ती उत्साहानं सामाजिक राजकीय काम करण्याचं ईच्छा व्यक्त करणार असेल तर ही चांगली गोष्ट आहे.(kolhapur news)
महाराष्ट्र पोलिसांच्या उपस्थित समाज कंटाकांनी किंवा शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांवर हल्ला केला. सगळ्या एजन्सीज असताना हा हल्ला कसा झाला याची दखल केंद्रीय गृहखात्याने घेतली आहे. नवनीत राणा विषयांमध्ये लोकसभेचे अध्यक्षांनी दखल घेतली आहे. केंद्राची सिक्युरिटी असतानाही सोमय्यांच्यावर हल्ला कसा होतो. त्यावेळी महाराष्ट्र पोलिस बघ्याची भूमिक घेत होते का, याची दखल केंद्रीय गृहखात्याने घेतेली आहे, असंही ते म्हणाले.
सोमय्यांवरील हल्ल्या संदर्भात ते म्हणाले, किरकोळ जखम आणि मोठी जखम यात काही फरक नसतो. तो हल्ला जीवे मारण्याच्या प्रयत्नाने केला होता. आणि जीवे मारण्याच्या प्रयत्नाला 307 कलम लागू होतं. त्यामुळे सोमय्यांवर झालेल्या हल्ल्यावक 307 कलम लागलं पाहिजे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्रात सरकार तुमचं असताना अशावेळी तुम्ही काय करत आहात? असा सवालही त्यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना यावेळी केला आहे.
हेही वाचा: