महिलांबद्दल धनंजय महाडिकांच्या ‘त्या’ वक्तव्याचा कोल्हापुरात संताप!

सध्या कोल्हापुरात (kolhapur news) उत्तरच्या निवडणुकांचे वारे वाहत आहे. भाजप आणि महाविकास आघाडीतील दिग्गज नेत्यांची जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. दरम्यान, आरोपप्रत्योरोपांचे सत्र सुरुच आहे. यात आता एक वेगळी बातमी समोर आली आहे. भाजपाचे नेते धनंजय महाडिक यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यात त्यांनी केलेल्या वक्तव्यावर नागरिकांच्या तीव्र संताप व्यक्त करणाऱ्या कमेंट्सही येत आहेत.
एका वृत्तवाहिनेने दिलेल्या वृत्तानुसार महाडिक यांनी या व्हिडिओतून महिलांचा अपमान केल्याचे समोर आलं आहे. कोल्हापूरच्या पोट निवडणुकीच्या प्रचारात यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. पती करेल ते पत्नी करू शकेल का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. काँग्रेसचं लोक येतील आणि तुम्हाला सांगतील की, आम्ही एक महिला उमेदवार उभी केली आहे.(kolhapur news)
ती बिचारी आहे. महिला म्हणून तुम्ही त्यांना मतदान करा. तर त्यांना विचारा एक पुरुष करतो ती कामं महिला करु शकणार नाही, असं वक्तव्य करत त्यांनी महिलांचा अपमान केला आहे. यामुळं आता कोल्हापुरातील राजकारण चांगलंच तापलं आहे. दरम्यान, या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरात निषेध म्हणून काळे ड्रेस आणि काळी साडी परिधान करून महिलांकडून आंदोलन छेडण्यात येणार आहे. कावळा नाका परिसरात हे आंदोलन होणार आहे.
काय म्हणालेत महाडिक
कॉंग्रसचे लोक येतील आणि सांगतील आम्ही एक महिला उभी केली आहे. ती बिचारी आहे. तुम्ही सगळ्या महिला आहात तिला मतदान करा. मला सांगा तुमच्या कुटुंबातल्या तुमचा पती एकदा प्लंबिंग काम करत असेल तुम्हाला ते काम जमणार आहे का? किंवा तुमचा पती इलेक्ट्रिशियन असेल तुम्हाला ते काम जमणार आहे का ? ज्याचं काम त्यानं करायचं असतं, असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं आहे.
हेही वाचा :