कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच एक “महिला” आमदार म्हणून आल्या निवडून …

kolhapur news – महाविकास आघाडीच्या अडिच वर्षांच्या कामगिरीची परिक्षा ठरलेल्या आणि दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. कोल्हापुरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वात लढलेल्या गेलेल्या या निवडणुकीत ‘आण्णांच्या माघारी, आता आपली जबाबदारी’ ही टॅगलाईन खरी करत महाविकास आघाडीने एकत्रित येत भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांचा मोठा पराभव केला आहे. निकालानंतर विजयी उमेदवारांचे समर्थक व कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आताषबाजी करत एकच जल्लोष केला.
या विजयामुळे जयश्री जाधव या कोल्हापूर शहरातून निवडून आलेल्या पहिल्या महिला आमदार ठरल्या आहेत आणि ही निश्चितच कोल्हापूरसाठी अभिमानाची गोष्ट ठरली आहे.
kolhapur news – 26 व्या फेरी अखेर
👉काँग्रेस: जयश्री जाधव- 96226
👉भाजप: सत्यजित कदम-77426
कोल्हापूरकरांसाठी अभिमान वाटणारी गोष्ट का?
आख्या जगासाठी वूमन असतं, महिला असतं पण कोल्हापूरात “बाईमाणसं” असतं. नऊवारी लुगडं नेसून नवऱ्याच्या मिशीचा आकडा उतरवणारी खमकी बाई कोल्हापूरच्या जगण्याची गोष्टय. म्हणूनच इथल्या पोरी पण “मी आलो”, “मी गेलो” ची पुल्लिंगी भाषा बोलत असतात.
हेही वाचा :