तुझे खेळ बंद कर नाहीतर….; क्षीरसागरांचा इंगवलेंना इशारा!

मंत्री एकनाथ शिंदे  यांच्या बंडाची ठिणगी आता हळूहळू पसरु लागली आहे. राज्यातील शिवसैनिक आक्रमक झाले असून आज पुण्यात तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोट केली तर कोल्हापुरात (kolhapur news) राजेश क्षीरसागर यांचे पोस्टर फाडले. या घटनेनंतर तानाजी सावंत यांनी फेसबुक पोस्ट करत इशारा दिला.

तर माजी आमदार राजेश क्षीरसागर  यांनी व्हिडिओ शेअर करत नाव न घेता रविकिरण इंगवले  यांना इशारा दिला आहे. तु गुंड असशील तर मी सुशिक्षित गुंड आहे. तुझे खेळ बंद कर नाहीतर, पळताभुई थोडी होईल असा इशारा त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिला आहे.

काय म्हणाले व्हिडिओत राजेश क्षीरसागर-

“गेल्या आठ दिवसापासून शिवसेनेमध्ये ज्या काही घडामोडी सुरू आहेत, या घडामोडींचा फायदा घेऊन काही लोक वरिष्ठांच्या सूचनेनुसार आणि कोल्हापुरातील एक गुंड जो स्वतःला गुंड म्हणतो पण त्याच्यात काही दम नाही. दुसऱ्याने 302 गुन्हा केला पण मी केला म्हणून तो जेलमध्ये गेला. असा दम नसलेला गुंड शिवसेनेच्या पोस्टवर असणारे माझे फोटो आणि पोस्टर फाडत आहे. तू गुंड आहेस मी सुशिक्षित गुंड आहे. तुझे जे काही रेकॉर्डिंगचे खेळ सुरू आहेत ते खेळ बंद कर, अन्यथा माझ्यासारखा सुशिक्षित गुंड जेव्हा बाहेर पडेल तेव्हा तुला पळताभुई थोडी होईल”, असा इशारा यावेळी क्षीरसागर यांनी रविकिरण इंगवले यांचे नाव न घेता दिला.(kolhapur news)

“शिवसेनेसाठी मी गेली ३६ वर्षे मी योगदान देत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात असे योगदान कोणीही दिलेले नाही. २००४ साली जेव्हा नारायण राणे यांनी शिवसेना सोडली होती तेव्हा शिवसेना संपली होती. त्यामुळे मी काय केले हे मला माहित आहे. त्यामुळे सर्व पदाधिकाऱ्यांना आवाहन आहे. जो कोणी वैयक्तिक फायदा करून घेत असेल, त्यामुळे शिवसेनेचे नुकसान होत असेल त्याला पाठीशी घालू नका. मी शिवसेना सोडलेली नाही. मी शिवसेनेतच आहे. राजेश क्षीरसागर एवढा कमजोर नाही. तुला सोडणार नाही एवढे लक्षात ठेव,” असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

हेही वाचा :


माझी बांधिलकी शिरोळच्या जनतेशी- मंत्री यड्रावकर

Leave a Reply

Your email address will not be published.