सतेज पाटलांच्या बालेकिल्ल्याचे भाजपासमोर तगडे आव्हान

kolhapur news today satej patil

kolhapur news today – पाच राज्यांच्या निवडणुकीत चार राज्यांतील दणदणीत यशामुळे कोल्हापूर उत्तर (Nortth Kolhapur) विधानसभा निवडणुकीत भाजपचा  आत्मविश्‍वास वाढला आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांचा प्रभाव असलेला कसबा बावडा मतदार संघात येतो. त्यामुळे हा बालेकिल्ला छेदण्याचे आव्हान भाजपसमोर असेल.

देगलूर व पंढरपूरचा अनुभव पाहता भाजप ही निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. भाजपकडून माजी नगरसेवक सत्यजित कदम, माजी जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांची नावे चर्चेत आहेत. मतदार संघात भाजपची (BJP) सुमारे ४५ हजार मते आहेत. २००४ व २०१९ चा अपवाद वगळता २० वर्षे शिवसेनेचे वर्चस्व होते.

तत्पुर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला अशीच ओळख होती. तब्बल ३० हजारपेक्षा जास्त मतदान असलेल्या बावड्यात पालकमंत्री पाटील म्हणतील त्यालाच मते पडतात. त्यात कदम हे भाजपचे उमेदवार राहिले तर ते महाडिकांचे जवळचे नातेवाईक. त्यामुळे पालकमंत्री पाटील ताकदीने मैदानात उतरतील. त्यातही ही जागा काँग्रेसची आणि पाटील हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यामुळे ही जागा निवडून आणणे त्यांच्या दृष्टीने (kolhapur news today) प्रतिष्ठेचे आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कोल्हापुरचे, त्यांच्यादृष्टीने ही जागा जिंकणे प्रतिष्ठेचे आहे. हिंदुत्त्ववादी मतांत विभागणी व्हावी यासाठी शिवसेनेचा उमेदवार रिंगणात उतरण्याच्या हालचाली दोन्ही काँग्रेसच्या पातळीवर सुरू आहेत. राज्यात दोन्ही काँग्रेससह शिवसेना एकत्रित सत्तेत आहे. त्या जोरावर तिन्हीही पक्षांची एकत्रित ताकद वापरून काँग्रेसचा ही जागा जिंकण्याचा प्रयत्न असेल.


हेही वाचा :


पांढरे केस जास्त झालेत?काळ्याभोर केसांचं जाणून घ्या सोपं सिक्रेट..!


प्रसिद्ध अभिनेत्याची भर स्टेजवर छेडछाड!


कोल्हापूर :शिवाजी विद्यापीठात राज्यपालांचा तीव्र निषेध..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *