कोल्हापूर ‘उत्तर’ची रणधुमाळी…

kolhapur news today – ‘कोल्हापूर उत्तर’च्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी आजपासून सुरू होत असली, तरी खरी धूळवड मात्र होळीनंतरच सुरू होणार आहे. आजपासून या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. (BJP) अर्ज भरण्याची अंतिम मुदत २४ मार्च असून, १२ एप्रिलला मतदान आहे. मतमोजणी १६ एप्रिलला होईल. निवडणूक निर्णय अधिकारी श्रावण क्षीरसागर आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील क्षीरसागर यांच्या दालनात निवडणुकीची प्रक्रिया होईल.
आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पथकाची नियुक्ती केली आहे. केवळ या मतदारसंघापुरतीच आचारसंहिता आहे. यातील बहुतांश भाग महापालिकेशी संबंधित आहे. (kolhapur news today)
आजपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत असली तरी होळी, मग धूलिवंदनाची सुटी आहे. त्यामुळे १९ पासून निवडणुकीत खरा रंग भरण्यास सुरुवात होईल.
प्रशासकीय पातळीवर कर्मचारी नियुक्त करणे, मतदान केंद्रांची डागडुजी करणे, एक हजार २५० पेक्षा अधिक मतदार असतील, त्याच ठिकाणी नवीन मतदान केंद्र करावे लागणार आहे, याचा आढावा प्रशासन घेत आहे, असे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संतोष कणसे यांनी सांगितले.
हेही वाचा :