कोल्हापूरात पेट्रोल, डिझेल खरेदी या दिवशी राहणार बंद…

पेट्रोल पंपचालकांना पेट्रोल (petrol) व डिझेल विक्रीवर कमिशन वाढवून मिळावे, या मागणीकडे पेट्रोलियम कंपन्यांचे लक्ष वेधण्यासाठी दि. 31 मे रोजी एक दिवस पेट्रोल, डिझेल खरेदी न करण्?याचा निर्णय फामपेडा संघटनेने घेतला आहे. मात्र, पेट्रोल, डिझेलची विक्री सुरू राहणार आहे.
वारंवार मागणी करूनही 2017 सालापासून पेट्रोल, डिझेल विक्रीवरील कमिशन पेट्रोलियम कंपन्यांनी वाढविलेले नाही. इंधनाचे दर कमी-जास्त होत होते तेव्हा पेट्रोल वितरकांना त्याचा फटका बसला आहे.
कोरोना काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्?या किमती कमी होत्?या. तेव्हा पेट्रोल (petrol), डिझेलचे दर कमी करणे आवश्यक होते; पण ते केले गेले नाहीत. त्यावेळी झालेल्या फायद्याचा कंपन्यांनी वितरकांना लाभ दिला नाही. आता अबकारी करात कपात केल्याने त्याचा कमिशनवर परिणाम झाला आहे. कमिशनमध्?ये वाढ मिळावी, यासाठी एक दिवस इंधन खरेदी न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप सुरू राहणार आहेत. ग्राहकांना नियमितपणे पेट्रोल, डिझेल मिळणार आहे, असे कोल्हापूर जिल्हा पेट्रोल, डिझेल असोसिएशनचे अध्यक्ष अरविंद तराळ यांनी सांगितले.
हेही वाचा: