कोल्हापुरात शिवसैनिक आक्रमक, उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ काढला मोर्चा!

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. (kolhapur politics) राजेश क्षीरसागर हे सध्या गुवाहाटीमध्ये आहेत. क्षीरसागर आणि एकनाथ शिंदे यांचा गुवाहाटीमधील एकत्र फोटो समोर आला आहे.

राजेश क्षीरसागर हे शिंदे गटात सामिल झाल्याने कोल्हापूरमधील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढला. आक्रमक पावित्रा घेत, घोषणाबाजी करत शिवसैनिक मोर्चात सामील झाले होते. मोर्चात महिलांचा अधिक समावेश आहे.(kolhapur politics)

जे काही गेलेत ते कावळे आणि जे उरले ते मावळे
स्थानिक प्रंचड नाराज झाले आहेत. जे काही गेलेत ते कावळे आणि जे उरले आहेत ते मावळे. अशा घोषणा शिवसैनिकांनी दिल्या. महिला शक्ती ताकदीने उभा राहणार आहे.

kolhapur politics

उध्दव ठाकरे आणि मातोश्रीच्या पाठीमागे आम्ही सदैव कायम राहणार आहे, अशा प्रतिक्रिया मोर्चात सहभागी झालेल्या महिलांनी दिल्या आहेत. राजेश क्षीरसागर यांच्या शनिवार पेठेतील निवासस्थानाजवळ खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

 

हेही वाचा :


Leave a Reply

Your email address will not be published.