कोल्हापूर : शाहू मिलमध्ये उद्यापासून लोककलांचे सादरीकरण!

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व अंतर्गत भारत सरकारच्या केंद्रीय संस्कृती मंत्रालयाच्या दक्षिण मध्य क्षेत्र केंद्र नागपूर व कोल्हापूर जिल्हा प्रशासनातर्फे 12 राज्यांतील 190 लोककलावंत कोल्हापुरात 14 व 15 मे रोजी छत्रपत्री शाहू मिल येथील सभागृहात विविध लोककला (folk art) सादर करणार आहेत. सायंकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत याचे सादरीकरण होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
नागपूर दक्षिण मध्य क्षेत्र केंद्राचे संचालक दीपक खिरवाडकर, माजी खासदार संभाजीराजे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार सर्वश्री पी. एन. पाटील, जयंत आसगावकर, ऋतुराज पाटील उपस्थित राहणार आहेत. लोककलावंत आपल्या कलेतून राजर्षी शाहू महाराजांना आदरांजली वाहणार आहेत.
यामध्ये महाराष्ट्र राज्य पोवाडा (folk art), धनगरी गजा, सोंगी मुखवटे, लावणी, मध्य प्रदेश : गुदुम बाजा, छत्तीसगड, पंथी नृत्य, पंजाब : भांगडा नृत्य, गुजरात : सिद्धी धमाल, आसाम : बिहू नृत्य, हरियाणा : घुमर, कर्नाटक : हालकी सुग्गी कुनिथा या सर्व नृत्यांचे सादरीकरण करणार आहेत. कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
हेही वाचा :