कोल्हापूर : राऊतवाडी धबधब्यावर २२ हुल्लडबाजांवर कारवाई

राधानगरी तालुक्यातील राऊतवाडी (waterfalls near me) धबधब्यावर २२ हुल्लडबाज पर्यटकांवर शाहुवाडी विभागाच्या निर्भया पथकाने कारवाई केली. या कारवाईचे स्थानिक नागरिक आणि पर्यटकांतून स्वागत होत आहे.

शाहूवाडी विभागाचे डीवायएसपी रविंद्र साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखालील पथक प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक बी. बी. मलगुडे, पोलीस नाईक स्वाती जुगर, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण कानुगडे यांच्या पथकाने राऊतवाडी धबधब्यावर (waterfalls near me) अचानक भेट दिली. यावेळी मद्य पिऊन हुल्लडबाजी करणे, दंगा करणे, दुचाकीवरून ट्रिपल सीट प्रवास, महिलांची छेडछाड करणाऱ्या २२ हुल्लडबाज पर्यटकांवर कारवाई करत अर्थिक दंड केला. निर्भया पथकाच्या कारवाईचे विशेषत: महिला वर्गातून स्वागत होत आहे.

Smart News :


मुलीनंतर दुसऱ्या बाळाच्या स्वागतासाठी निक प्रियांका सज्ज

Leave a Reply

Your email address will not be published.