कोल्हापूर :नुकसानग्रस्तांना २२ कोटींचे वाटप!

जुलै २०२१ मध्ये झालेल्या पावसाने तालुक्यातील ५१ गावांत ९ हजार ३८६ हेक्टर शेतीचे नुकसान झाले. त्यातील २० हजार १४३ लाभार्थ्यांना १३ कोटी ५६ लाख ८८ हजार ८५३ रुपयांचे वाटप केले. इतर ५ हजार ६२२ लाभार्थ्यांना (beneficiaries) ८ कोटी २३ लाख ८३ हजार ७२५ रुपये वाटप केले आहे. तालुक्यात शेती, उद्योग, सानुग्रह अनुदान असे मिळून एकूण २२ कोटी रुपयांचे वाटप केले, तर लाभार्थ्यांच्या कागदपत्रात काही तांत्रिक त्रुटी राहिल्याने सुमारे पाच कोटींचा निधी परत गेला आहे. कुकुटपालनच्या १२ लाभार्थ्यांना ६० हजारांचे वाटप केले.
नुकसानग्रस्त १८४ दुकानदारांसाठी आलेले दोन कोटी आठ लाख रुपयांपैकी २९ लाख ३ हजार २०० रुपयांचे वाटप केले. वीज पडून टोप येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता, त्याच्या वारसांना चार लाखांची मदत शासनातर्फे केली आहे.
शासनाकडून आलेली सर्व मदत लाभार्थ्यांपर्यंत (beneficiaries) पोहोचवण्यासाठी महसूल, कृषीसह सर्वच विभागांच्या कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षणापासून वाटपापर्यंत योग्य काम केले आहे. फक्त उद्योग व्यावसायिकांसाठी शासन निर्णयच नसल्याने प्रस्ताव पाठवूनही ते मदतीपासून वंचित राहिले.
दृष्टिक्षेपात…
– शेतीचे नुकसान
* शेतीचे नुकसान – ९ हजार ३८६ हेक्टर
*मिळालेली भरपाई- १४ कोटी ८ लाख २८ हजार ९१५
*वाटप झालेली रक्कम -१३ कोटी ५६ लाख ८८ हजार ८५३
* निधी परत – ५१ लाख ४० हजार ६२
सानुग्रह अनुदान
*एकूण लाभार्थी- ४ हजार ५२१
*अनुदान वाटप- ४ कोटी ५२ लाख १० हजार
* निधी परत ः ४१ लाख ३० हजार
गोठा, घर पडझड
*लाभार्थी- ७०५
*प्राप्त अनुदान – ५ कोटी ३८ लाख १५ हजार ४००
*वाटप अनुदान – ३ कोटी ६३ लाख ७२ हजार ५००
*परत निधी – १ कोटी ७४ लाख ४२ हजार ९००
कारागीर
*लाभार्थी – ९७
*प्राप्त अनुदान – ५२ लाख ८४ हजार
*वाटप – ९ लाख ९५ हजार २५
*परत निधी – ४२ लाख ८८ हजार ९७५
भूस्खलन नुकसान
*लाभार्थी – ६२
*प्राप्त अनुदान – ४ लाख ७४ हजार
*वाटप – २ लाख ३९ हजार २५०
*परत निधी – २ लाख ३४ हजार ७५०
दुकानदार
*लाभार्थी – १८४
*प्राप्त अनुदान – २ कोटी आठ लाख
*वाटप – २९ लाख ३ हजार २००
*परत निधी – १ कोटी ७८ लाख ९६ हजार ८००
टपरीधारक
*लाभार्थी – २०
*प्राप्त अनुदान – ५ लाख २० हजार
*वाटप -७२ हजार ७५०
*परत निधी – ४ लाख ४७ हजार २५०
मृत जनावरे
*लाभार्थी – २०
प्राप्त अनुदान – ७ लाख ७ हजार २००
वाटप – ६ लाख ६१ हजार
परत निधी – ४६ हजार २००
कुक्कुटपालन शेड
लाभार्थी – १२
प्राप्त अनुदान- ६० हजार
वाटप – ६० हजार
हेही वाचा :