कोल्हापूर : खंडणीप्रकरणी संजय तेलनाडे याला अटक
मोकांतर्गत कारवाई (action)करण्यात आलेल्या एस. टी. सरकार गँगचा म्होरक्या व माजी नगरसेवक संजय तेलनाडे याला, पतीच्या संशयास्पद मृत्यूची भीती दाखवत जीवे मारण्याची धमकी देऊन वृद्धेचे घर बळकावण्यासह 20 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात गावभाग पोलिसांनी बुधवारी अटक केली. त्यास न्यायालयात हजर केले असता 28 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. याची माहिती गावभागचे पोलिस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी दिली.
फरार असणार्या संजय तेलनाडे याला पाच महिन्यांपूर्वी पोलिसांनी अटक (action)केली होती. तो सध्या कारागृहात होता. 5 मार्च 2020 रोजी घर बळकावण्यासह 20 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी त्याच्यासह पाच जणांविरोधात गावभाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यापैकी तिघांना यापूर्वीच अटक केली आहे. न्यायालयाच्या परवानगीने गावभाग पोलिसांनी या गुन्ह्याच्या अनुषंगाने तेलनाडे यास ताब्यात घेतले. या प्रकरणातील त्याचा भाऊ माजी नगरसेवक सुनील शंकर तेलनाडे अद्याप फरार आहे.
हेही वाचा: