कोल्हापूर: हुपरीत जुगार अड्ड्यावर छापा ; १४ परप्रांतीय कामगारांना अटक!

हुपरी (ता.हातकणंगले) येथील काजवे गल्लीतील अशोक खोत यांच्या खोलीत तीन पानी जुगार खेळणाऱ्या १४ परप्रांतीयाना हुपरी पोलिसांनी अटक केली असुन, त्यांच्याकडून ९१५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.(saturday)

ही कारवाई (saturday) शनिवारी (दि.२६) रात्री उशीरा करण्यात आली. या प्रकरणी अटक करण्‍यात आलेले परप्रांतीय कामगार असून, हुपरी परिसरात कामानिमित्ताने आले आहेत.

काजवे गल्‍लीत काही जण तीन पानी जुगार खेळत असल्याची माहिती सपोनि पंकज गिरी यांना शनिवारी रात्री मिळाली. त्यांच्‍या पथकाने केलेल्‍या कारवाईत १५०८० रुपयांची राेकड, ७६५०० किंमतीचे ८ मोबाईल संच जप्त करण्यात आले.

याप्रकरणी अटक केलेल्याची नावे अशी, मनोज गिताराम गोस्वामी, (वय 22 वर्षे), पवन चंदनसिंह माहौर, (वय 31 वर्षे), सुरेश वसंतराम माहौर (वय 22 वर्षे), विजय सुरेश माहौर (वय 21 वर्ष), करण विजेंद्र कुशवाह (वय 20 वर्षे), पंकज सुरेश प्रजापती (वय 24 वर्षे), रिकुकुमार गोवर्धन प्रजापती (वय 28 वर्षे), दिपु विनोद शर्मा(वय 25 वर्षे) , ललीत फकीरचंद माहौर (वय 19 वर्षे), जितु सुमकुमार प्रजापती (वय 18 वर्षे), अजय भिमसिंह माहौर (वय 30 वर्षे), कमल सतीश सक्सेना (वय 36 वर्षे), सोनु हिरालाल बर्मा (वय 35 वर्षे), सनी चंद्रप्रकाश माहौर (वय 19 वर्षे) सर्व राहणार उत्तर प्रदेश. सध्या रहाणार काजवे गल्ली हुपरी. याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल जमीर जमादार यानी दिली असून तपास हवालदार सावरतकर, संतोष तेली करीत आहेत.

हेही वाचा :


राजेश क्षीरसागर यांचे पोस्टर फाडले, रवी इंगवले यांच्यासह १० जणांवर गुन्हा दाखल!

Leave a Reply

Your email address will not be published.