कोल्हापूर: शाळेतून शिक्षकाला चौकात बोलावत कोयत्याने जीवघेणा हल्ला,

High School

Kolhapur Crime : कोल्हापूरमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. भर दिवसा एका शिक्षकावर हल्ला झाला आहे. दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली असून शिक्षकावर अशा प्रकारचा हल्ला झाल्याने शाळेच्या आवारामध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आहे. कारण शिक्षकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला झाला आहे. (High School)

नेमकं काय घडलं? 
संस्कार शिक्षण मंडळाच्या सुसंस्कार हायस्कूलमधील संजय सुतार असं हल्ला झालेल्या शिक्षकाचं नाव आहे. कदमवाडी चौकात संजय यांना बोलावण्यात आलं, तिथे गेल्यावर त्यांच्यावर अज्ञातांनी कोयत्याने हल्ला चढवला. दुपारी एकच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला. शाळेच्या आवारातच झालेल्या हल्ल्यामुळे घटनास्थळी विद्यार्थ्यांचे पालक आणि बघ्यांची मोठी गर्दी असून शाहूपुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.(High School)

जखमी संजय सुतार यांच्यावर सध्या कदमवाडीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून तपास सुरू केला आहे. हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून करण्यात आला या संदर्भात कोणतीच माहिती उपलब्ध झालेली नाही, त्यामुळे पोलीस या घटनेच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहेत.

दरम्यान, मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार कदमवाडी चौकात शाळेतून बाहेर बोलावून शिक्षकावर कोयत्याने हल्ला करण्यात आला असून सध्या शिक्षक संजय सुतार यांची प्रकृती गंभीर आहे. शिक्षकावर झालेल्या हल्ल्याची खबर वाऱ्यासारखी पसरली.

Smart News:-