कोल्हापूर : शिवशाही बसचा ब्रेक निकामी

kolhapur news

kolhapur news- मध्यवर्ती बसस्थानक परिसरात आज शिवशाही बसचा अचानक ब्रेक निकामी झाल्याने अपघात घडला. गजबजलेल्या परिसरात मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र सात वाहनांचे नुकसान झाले.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी ः पुणे-कोल्हापूर-पणजी शिवशाही बस प्रवासी घेऊन मध्यवर्ती बसस्थानकातून पणजीकडे आज दुपारी साडेतीनच्या सुमारास जात होती.

दाभोळकर कॉर्नरच्या दिशेने जात असताना बस प्रवासी घेण्यासाठी थांबली. त्याचवेळी अचानक बसचा ब्रेक निकामी झाला. तशी बस पाठीमागे जाऊ लागली. गजबजलेल्या ठिकाणी घडलेली ही घटना पाहून परिसरातील नागरिकांनी आरडाओरडा केला. तशी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात येताच चालकाने ती बस नियंत्रित करण्याचा प्रयत्न सुरू केला. पाठीमागील नागरिकांना बाजूला होण्याच्या सूचना करण्यास सुरवात केली. त्याचेवळी पाठीमागून एक स्कूलबस येत होती. चालकाने प्रसंगावधान राखत बस बाजूला असणाऱ्या चेंबर्सच्या दिशेने वळवली.(kolhapur news)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *