कोल्हापूर: रिंगण सोहळ्यावरून पोलिस-वारकऱ्यांमध्ये तुफान राडा..!

कोल्हापूर जिल्ह्यातील प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या नंदवाळ येथील रिंगण सोहळ्याचा वाद चिघळला आहे. यावेळी पोलिस आणि वारकऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाली आहे. आरक्षित (reserved) जागेवर रिंगण सोहळा करण्यावर हा वाद झाला आहे.
येथील आरक्षित (reserved) केलेली मूळ जागा ही नंदवाळचे गायरान आहे. गावचा विरोध असतानाही शासनाने ही जागा बटालियनला दिली आहे. त्यामुळे त्या जागेवर आम्हाला रिंगण सोहळा करू देत नाहीत, या मागणीसाठी ग्रामस्थ आणि परिसरातील भाविक संतप्त झाले होते.
दरम्यान, भारत बटालियनच्या आरक्षित जागेवर रिंगण सोहळा करण्यावर वारकरी आणि ग्रामस्थ ठाम असून या रिंगण सोहळ्याला भारत बटालियनच्या पोलिसांनी विरोध केल्याने हा वाद आणखी चिघळला आहे.
आज हरिनाम सप्ताह निमित्त रिंगण सोहळ्याचे नियोजन हे गावकऱ्यांनी केलं होतं. मात्र भारत बटालीयनच्या पोलिसांनी याला विरोध केल्यामुळे पोलिस आणि वारकरी हे आमने-सामने आल्याने धक्काबुक्की झाली आहे. दरम्यान सध्या या गावात तणावाची परिस्थिती कायम असून मोठा पोलिस फौजफाटा दाखल झाला आहे.
हेही वाचा :