कोल्हापूर: जोतिबा मंदिराबाहेर ग्रामस्थांचे आंदोलन..!

ई पास बंद करून जोतिबा मंदिराचे (temple) चारही दरवाजे खुले करावेत या मागणीसाठी जोतिबा वाडी येथे ग्रामपंचायत आणि समस्त गुरव समाजाच्यावतीने आंदोलन करण्यात आले.
जोतिबा मंदिर (temple) उत्तर प्रवेशद्वारात सुमारे एक हजारहून अधिक लोक आंदोलनात सहभागी झाले असून गाव बंद ठेवून आंदोलन सुरू केले आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून श्री जोतिबा देवस्थान प्रसिद्ध आहे. तर सध्या जोतिबाचे खेटे सुरु आहेत. त्यामुळे दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. दरम्यान येथील गुरव समाजाने मंगळवारी (दि.८) जिल्हाधिकाऱ्यांना ई पास बंद करून मंदिराचे दरवाजे खुले करावेत अन्यथा आज, शुक्रवारी आंदोलनाचा इशारा दिला होता.
मात्र, प्रशासनाने या निवेदनाची दखल घेतली नाही. म्हणून ग्रामपंचायत आणि गुरव समाज व नागरिकांनी जोतिबा मंदिराचे बंद दरवाजे खुले करण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे. शासनाने कोरोनाचे नियम शिथिल केले आहेत. मग ई- पास ही बंद करावा. भाविक आणि देवस्थान व पोलीस प्रशासन यांच्यात वारंवार वाद होत आहेत. म्हणूनच गुरव समाजाच्यावतीने या विरोधात गाव बंद ठेवून मंदिराच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले. या आंदोलनात विष्णूपंत दादर्णे गोरख बुने, मानाचे दहा गावकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
..तो पर्यंत आंदोलन सुरू ठेवणार
जोतिबा डोंगरावर सुमारे पाचशेहून अधिक लहान मोठी विविध व्यावसायिका़ंची दुकाने आहेत. या सर्वांनी दुकाने बंद ठेवून आंदोलनात सहभाग नोंदविला आहे. जोपर्यंत ही अट शिथील केली जात नाही तो पर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा :