कोल्हापूर: जिल्ह्यात पंचगंगा नदी,तलाव वगळता सर्व. मंडळांच्या गणेशमूर्तींचेही खणीत विसर्जन;

Anant Chaturdashi

जिल्हा व पोलीस प्रशासनाच्या प्रयत्नांना यश;

मध्यरात्री साऊंड सिस्टिम बंद केल्याने पहाटे सहा पासून पुन्हा मिरवणूक;

विसर्जनासाठी तब्बल २७ ते २८ तास;

कोल्हापूर:  संपूर्ण राज्यात लक्षवेधी ठरणारी येथील सार्व.गणेश उत्सव मंडळांची विसर्जन मिरवणूक(Anant Chaturdashi) यंदाही विशेष चर्चेत राहिली.दिवसा पारंपारिक वाद्यांच्या गजरात तर रात्री लेझर किरणांच्या झगमगटात सुरू असलेली ही मिरवणूक नियमानुसार मध्यरात्री साऊंड सिस्टीम बंद करावयास लावल्याने, काही मंडळां- च्या हट्टामुळे पहाटे सहा पासून पुन्हा सुरू झाली. किरकोळ अपवाद वगळता,तब्बल २७ ते २८ तासांनी वरुन राजाच्या उपस्थितीत निर्विघ्न वातावरणात हि विसर्जन मिरवणूक पार पडली. घरगुती प्रमाणे सार्व.गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तींचे विसर्जनही रंकाळा तलाव परिसरातील इराणी खणीत करण्यात आले.परिणामी पंचगंगा नदी घाट,रंकाळा,राजाराम तलाव आदी परिसरातील शुकशुकाट या मिरवणुकीचे वैशिष्ट्य ठरले.जिल्हा प्रशासनाच्या पर्यावरण पूरक गणेशोत्सवास सर्व मंडळांनी प्रतिसाद दिला.

महापुरासह कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन वर्षानंतर राज्य शासनाने सन-उत्सवही निर्बंध मुक्त केल्याने,यंदा गणेशोत्सव सर्वत्र धुमधडाक्यात साजरा झाला.ध्वनी,जल प्रदूषणाचे नियम कायम राहणार असले तरी याबाबत अनेक सार्व.मंडळे अनभिन्न असल्याने,येथे श्रीगणेशाच्या आगमनापासून वादाचा विषय असलेल्या साऊंड सिस्टीमच्या आवाजावर मर्यादा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने सुरवातीपासूनच कठोर भूमिका घेतली.आतापर्यंतचा अनुभव पाहता, न्यायालयाच्या आदेशाचे अत्यंत काटेकोरपणे पालन करत,श्रीगणेश आगमनाच्या दिवशीही राजारामपुरीतील मंडळांना वेळेसह आवाजाची मर्यादा घालून दिली.पारंपरिक विसर्जन(Anant Chaturdashi) मार्गाच्या महाद्वार रोड वरील २५ हुन अधिक धोकादायक इमारतीमुळे कोणतीही जिवित हाणी होऊ नये, याची खबरदारी म्हणून यंदा विसर्जन मिरवणुकी – साठी पारंपरिकसह अन्य दोन पर्यायी मार्ग, पोलिस प्रशासनाकडुन‌ निश्चित करण्यात आले. गंगावेस येथून पंचगंगा नदीकडे जाणारा मार्ग बंद करून,सर्व मुर्ती इराणी खणीकडे जाण्याची चोख व्यवस्था करण्यात आली.त्यालाही सर्व मंडळांचा प्रतिसाद मिळाला.

ऐतिहासिक खासबाग मैदान येथे,सकाळी ९ च्या सुमारास आम.सतेज पाटील,आम.जयश्री जाधव, जिल्हाधिकारी राहुल रेखावार,महानगरपालिका आयुक्त कादंबरी बलकवडे,जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे आदींच्या प्रमुख उपस्थितीत मानाच्या श्री तुकाराम माळी तालीम मंडळाच्या पालखीतील गणेशमूर्तीचे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते पूजन व आरती होऊन,विसर्जन (Anant Chaturdashi) मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी तुकाराम माळी तालीम मंडळाने, ” मला ग्रामीण व शहर विकासासाठी हद्दवाढ हवी ” या आशयाचा कित्येक वर्षे प्रतिक्षेतील शहर हद्दवाढी -चा केलेला देखावा लक्षवेधी ठरला.दिवसभर पारंपरिक वाद्यांचा गजर,मर्दानी खेळ,लेझीम, झांज आणि ढोलताशे पथक मिरवणूकीचे आकर्षण ठरले.मिरवणुकीत तात्याविंचूसह अनेक बहुरुप्यांच्या दर्शनाने अबाल-वृध्दाचे मनोरंजनही होत होते.लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांंसह नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.

सायंकाळी सहा नंतर मिरजकर तिकटी ते बिनखांबी गणेश मंदिर,गांधी मैदानाचे प्रवेशद्वार् ते बिनखांबी गणेश मंदिर आणि ताराबाई रोडवर मोठ्या मंडळांच्या गणेशमूर्ती वाजत गाजत दाखल झाल्या.रात्री आकर्षक विद्युत रोषणाई,लेसर किरणांच्या झगमगटाने विसर्जन मार्गासह आसमंत उजळून निघाला होता. फिरंगाई, वेताळमाळ, खंडोबा, अवचितपीर, नंगीवली, पाटाकडील, दिलबहार, बालगोपाल,  रंकाळवेस, वाघाची, जुना बुधवार, सुबराव गवळी या तालीम मंडळासह हिंदवी स्पोर्ट्स,श्रीशिवाजी आणि मित्रप्रेम मंडळांसह अन्य मंडळांच्या मिरवणुका आकर्षण ठरल्या.साऊंड सिस्टीम आणि वाद्यांच्या ठेक्यावर हात उंचावत नाचणारी तरुणाई आणि देहभान हरपून बाप्पाच्या विसर्जन (Anant Chaturdashi) मिरवणुकीत सहभागी झालेले कोल्हापूरकर असे दृश्य पहावयास मिळत होते.अवचितपिर तालीम मंडळाने यंदा मिरवणुकीत खास आणलेल्या रशियाच्या डीजे ज्युलिया ब्लिसच्या गाण्यांवर कोल्हापूरकर थिरकताना पाहायला मिळाले.

मिरवणूक मार्गावर महानगरपालिकेसह विविध पक्ष, संघटनांकडून मंडळांच्या स्वागतासाठी पानसुपारी कक्ष उभारले होते.ईराणी खण येथे महानगरपालिका प्रशासनातर्फे विसर्जनासाठी क्रेन,तराफांसह हजारो अधिकारी कर्मचारी दिवस रात्र कार्यरत होते.

 मध्यरात्री साऊंड सिस्टीम बंद म्हणजे बंद;

मंडळांचा ठिय्या अन् सकाळी पुन्हा दणदणाटात मिरवणूक न्यायालयाच्या निर्णयानुसार मध्यरात्री १२ नंतर पोलीस प्रशासनाकडून सर्व मंडळांच्या साऊंड सिस्टीम बंद करण्यात आल्या.काही मंडळांना नृत्य पथकांचा सहभाग घेण्यास ऐनवेळी मज्जाव करण्यात आल्याने,काही वेळ वादावादी होऊन त्या मंडळांनी मुख्य मिरवणुकीत सहभागी होण्याऐवजी अन्य मार्गाने मूर्तींचे विसर्जन(Anant Chaturdashi) करणे पसंत केले.वाघाची तालीम मंडळाने मुख्य मिरवणूक मार्गावरच वेळ लावल्याने,त्यामागील मंडळांना ताडपत्री हाथरून झोपावे लागले. त्यामुळे पहाटे सहानंतर रखडलेली ही मिरवणूक पुन्हा साऊंड सिस्टीमच्या दणदणाटात पुन्हा सुरू झाली.

 तीस तास बंदोबस्तासाठी तैनात पोलिसही थिरकले

विसर्जन मिरवणूकीत विक्रम नगर येथील भगतसिंग तरुण मंडळाच्या शेवटच्या गणेश मुर्तीचे पापाची तिकटी तेथे सकाळी अकराच्या सुमारास आगमन होताच, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते आरती करून विसर्जन मिरवणुकीची सांगता करण्यात आली.विसर्जन सुरळीत पार पडण्यासाठी गेल्या २८ ते ३० तासाहून अधिक काळ दिवस-रात्र बंदोबस्त करणा-या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यां – वरील ताण कमी झाल्याने,भर पावसात साऊंड सिस्टिम च्या तालावर ठेका धरुन,त्यांनीही बाप्पांना निरोप दिला.यावेळी उपस्थित मंडळाचे कार्यकर्ते तसेच नागरिकांनीही पोलिसांना दाद दिली.

 

धोकादायक इमारतीकडे नागरिकांचे दुर्लक्षच

विसर्जनाच्या महाद्वार रोड या मुख्यमार्गावर साऊंड सिस्टिमच्या दणदणाटामुळे गॅलरी कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका महिलेसह एका विवाहित तरुणाचाही दुर्दैवी मृत्यू झाला होता. याची पुनरावृत्ती होऊ नये,यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून या मार्गावरील पंचवीस हुन अधिक धोकादायक इमारतीवर फलक लावून, नागरिकांना सावध करण्याचा प्रयत्न केला पोलीस प्रशासनाकडून अशा इमारतीच्या ठिकाणी बॅरिकेट्स ही लावण्यात आले होते.तरीसुद्धा अशा धोकादायक इमारती +खाली महिला तसेच तरुण मुले बसल्याचे वारंवार दिसून येत होते.

 २ हजार २९८ मुर्तींचे विसर्जन

दुपारी बारा पर्यंतच्या आकडेवारी नुसार,ईराणी खणीत सार्व.मंडळांच्या एकुण १ हजार २५ मुर्तींचे विसर्जन करण्यात आले होते.यामध्ये
पर्यायी मार्गावरून २८४ मूर्ती दाखल झाल्या. शिवाय महानगरपालिकेच्या चारही विभागीय कार्यालयांतर्गत एकुण १ हजार २७३ घरगुती गणेश मुर्तीचे विसर्जन करण्यात आले.

Smart News:-