निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात मोठा मद्यसाठा जप्त..!

alcohol stock

होळी सणाच्या पार्श्वभूमीवर मोरेवाडी (ता. करवीर) परिसरातून राज्य उत्पान शुल्क विभागाने २५ लाख ८६ हजार रुपये किमंतीचा (alcohol stock) मद्यसाठा आणि ट्रक जप्त केला. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली. सद्दामहुसेन आदम मुल्ला (वय ३१) असे त्या संशयिताचे नाव असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले.

याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेली माहिती अशी, जिल्हा भरारी पथकास काल मोरेवाडी परिसरातील एका इमारतीत बेकायदेशीर मद्यसाठा (alcohol stock) करून त्याची शहर परिसरात वाहतूक व विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सायंकाळी पथकाने येथे छापा टाकला. येथील एका इमारती शेजारी उभ्या असलेल्या ट्रकची तपासणी केली.

alcohol stock

 

त्यामध्ये २५ लाख ८६ हजार ९२० रूपये किमंतीचे मद्याचे २२८ बॉक्स आणि ट्रक असा एकूण ३० लाख ६७ हजार ६२० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात संशयिताचे आणखी काही साथिदार आहेत का? याचा तपास सुरू असल्याचे पथक प्रमुख संभाजी बरगे यांनी सांगितले. ही कारवाई बरगे यांच्यासह निरीक्षक जगन्नाथ पाटील कर्मचारी सचिन काळेल, योगराज दळवी, मनोज पोवार, मारुती पोवार, जय शिनगारे, राजेंद्र कोळी, जयदीप ठमके, शिवाजी पाटील यांनी केली.

हेही वाचा :


Stock Market मधील या ‘पंचरंगी’ शेअर्समध्ये गुंतवणूक करा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *