राजेश क्षीरसागर एकनाथ शिंदे गटात सामील, फोटो आला समोर!

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. राजेश क्षीरसागर हे सध्या गुवाहाटीमध्ये आहेत. (latest politics) क्षीरसागर आणि एकनाथ शिंदे यांचा गुवाहाटीमधील एकत्र फोटो समोर आला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे काही आमदार नॉटरिचेबल झाल्यानंतर क्षीरसागर देखील नॉटरिचेबल झाले होते. पण ते गुवाहाटीला जाऊन शिंदे गटाला जाऊन मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.
राजेश क्षीरसागर हे दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. मातोश्रीच्या अत्यंत जवळचे आणि कोल्हापूरचे कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे. शिवसेनेच्या कोल्हापूर जिल्ह्यातील स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून ते शिवसैनिक म्हणून कार्यरत आहेत. याआधी भारतीय विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख, भारतीय विद्यार्थी सेना पश्चिम महाराष्ट्र प्रमुख, शिवसेना शहरप्रमुख आणि २ वेळा आमदार अशी त्यांची कारकीर्द आहे. (latest politics)
शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी हल्लीच राजेश क्षीरसागर यांच्याशी संवाद साधला होता. त्यानंतर क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते नॉटरिचेबल झाले होते.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या गटाला आज आणखी काही आमदार येऊन मिळण्याची शक्यता आहे. यामुळे शिंदे गटातील समर्थक आमदारांची संख्या ५० च्या वर जाईल, अशी अटकळ बांधली जात असल्याचे सुत्रांनी म्हटले आहे. सध्या शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ३७ आणि अपक्ष ९ आमदार आहेत.
हेही वाचा :