अबब! कोल्हापुरात मद्याचे 550 बॉक्स, कंटेनरसह 45 लाखांचा मुद्देमाल जप्त

liquor

औषधांच्या नावाखाली कंटेनरमधून गोवा बनावटीच्या मद्याची तस्करी करणाऱ्या  अनिल भाउसाहेब कदम (वय 33 रा. बीड) याला राज्य उत्पादन शुल्कने गांधीनगर फाटा येथे सापळा रचून जेरबंद केले. त्याच्याकडून (liquor) मद्याचे 550 बॉक्स, सहाचाकी (container) कंटेनर असा सुमारे 45 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

याबाबतची माहिती अशी, गोवा बनावटीच्या (liquor) मद्याची राज्य महामार्ग क्रमांक 4 वरुन उचगांवमार्गे छुप्या पद्धतीने तस्करी होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक रविंद्र आवळे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी भरारी पथकास रविवारी रात्री गांधीनगर येथे सापळा रचण्याचे आदेश दिले. भरारी पथकाने सापळा रचला असता त्यांना एक कंटेनर संशयास्पदरित्या शिरोलीच्या दिशेने निघाल्याचे दिसले. त्यांनी कंटेनरला थांबविले. यावेळी  वाहनचालक अनिल कदम याने कंटेनरमध्ये औषध असल्याचे सांगितले. याबाबतची कागदपत्रेही त्याने सादर केली.

liquor

मात्र भरारी पथकातील अधिकाऱयांना कागदपत्रांबाबत संशय आल्याने त्यांनी कंटेरच्या शरटचे सिल कट करुन तपासणी केली असता, आतमध्ये गोवा बनावटीच्या दारुचे विविध ब्रँडचे 550 बॉक्स मिळून आले. उत्पादन शुल्कचे उपअधीक्षक राजाराम खोत, हातकणंगले निरीक्षक संभाजी बरगे, कागल निरीक्षक जगन्नाथ पाटील, दुय्यम निरीक्षक बबन पाटील, शितल शिंदे, आनंद वाघमारे, सचिन लोंढे, सागर शिंदे, अनिल दांगट, बालाजी गिड्डे, राहुल संकपाळ, योगेश शेलार यांनी ही कारवाई केली.

गोवा दारूची तस्करी बीडपर्यंत

गोवा बनावटीच्या दारुची तस्करी बीडपर्यंत होणार असल्याची माहिती तपासामध्ये समोर आली आहे. या मागचा प्रमुख सुत्रधार कोण याचीही माहिती अधीकारी घेत आहेत. दारुची तस्करी करणाऱया टँकरचाही शोध घेण्याचे काम सुरु आहे. मालकाने हा ट्रक कोणाला भाडय़ाने दिला होता याची चौकशी पोलीस करत आहेत.

हेही वाचा :


विषारी दारुने हाहाकार : मृतांची संख्‍या २५ वर, ४० जणांवर उपचार सुरु

Leave a Reply

Your email address will not be published.