पूरग्रस्तांच्या हक्कासाठी भाजपचा कोल्हापुरात टाहो मोर्चा..!

पूरग्रस्तांच्या हक्कासाठी आज (दि. १) भाजपच्या वतीने कोल्हापुरात ‘टाहो’ मोर्चा काढण्यात आला. यावेळी बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील म्हणाले, की शासनाने २०१९ च्या पुराच्या अनुभवातून काही पूर्व तयारी करायला पाहिजे होती. (local news kolhapur) ती झाली नाही, त्यामुळे २०२१ ला पुन्हा पूर आला, पुन्हा लोकांचे संसार पाण्यात बुडाले. त्याची नुकसान भरपाई अजूनही अनेकांनी मिळालेली नाही. त्यामुळे ती सरकारने लवकरात लवकर देऊन यावर्षी पूर येऊच नये याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
यावेळी भाजपचे सत्यजित कदम, राहुल चिकोडी, समरजितसिंह घाटगे आदी नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येंने उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या काळात अचानक पूर आला तेव्हा १५ दिवस हेलिकॉप्टर नागरिकांच्या मदतीसाठी उभे होते. एनडीआरएफच्या तुकड्या तात्काळ उपलब्ध केल्या होत्या. (local news kolhapur) सांगलीतील एका गावातील बोट उलटली ही घटना सोडली तरी एकही बळी या महापुरात गेलेला नव्हता. कित्येक लोकांचे जीव त्याकाळी सरकारच्या नियोजनामुळे वाचले होते. प्रशासन आणि सरकारही ही मोठी ताकद असते, असंही ते म्हणाले.
दरम्यान, या टाहो आंदोलनात कोल्हापूरमधील कुंभार समाजही सहभागी झाला होता. त्यांनी प्रशासनाकडे गणपती तयार करण्यासाठी जमीन उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी केली आहे. शहरातील दसरा चौकातून या आंदोलनाला सुरुवात झाली असून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे.
हेही वाचा :