चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटील यांना थेट इशारा..!

local political news

पालकमंत्री सतेज पाटील यांनी समोरुन लढाई करावी, (local political news) कोणाचंही नाव घेऊन वार करु नयेत, असा थेट इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला. कोल्हापूर मधील कसबा बावडा येथे ते पत्रकारांशी बोलत होते. तसेच टोपी फेकली ती फिट बसली, तर दोष कुणाचा असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला‌.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, मी विधानसभेच्या अधिवेशनात अंतिम आठवड्यात पॉईंट ऑफ ऑर्डरद्वारे कोल्हापूर जिल्ह्यातील एका मंत्र्याच्या मालमत्ता कराच्या अनियमिततेबाबत मुद्दा मांडला. माजी महापौर सुनील कदम यांच्या लढाईचा एक भाग म्हणून हा विषय सभागृहात मांडला होता. सुनील कदम हे आपली लढाई लढतील. पण त्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील विविध नावे घेऊन, आरोप करत आहेत. तेव्हा सतेज पाटील यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांनी कोणाचंही नाव न घेता, समोरुन लढाई लढावी, मी त्याला उत्तर देण्यास समर्थ आहे.(local political news)

ते पुढे म्हणाले की, मी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला, तेव्हा कोणाचेही नाव घेतले नव्हते. केवळ मी टोपी फेकली, ती फिट बसली, तर त्यात दोष कुणाचा असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

local political news

किरीट सोमय्या यांच्यावर बोलताना पाटील म्हणाले की, किरीट सोमय्या हे अतिशय समर्थ नेते आहेत. त्यांनी आजपर्यंत जेवढे आरोप केले. त्यावर न्यायलयाच्या निर्णयानंतर कारवाई सुरू आहे. त्यामुळेच महाविकास आघाडी सरकार त्यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई करत आहे. पण भारतीय जनता पक्ष किरीट सोमय्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, पाटील यांनी आज कसबा-बावडा येथील हनुमानाच्या मंदिरात भजनात दंग होऊन विठ्ठलाचा जयघोष केला. तसेच हनुमानाची आरती केली आणि प्रसाद वाटप केले.

हेही वाचा :


उद्यापासून बँंकिंग सेवा होणार ठप्प! जाणून घ्या नेमकं कारण…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *