लोकांचा लोकनाथ..एकनाथ; कोल्हापुरात झळकला बॅनर, अन्..

शिवसेनेचे जेष्ठ नेते, मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत फूट पडली आहे. शिंदे यांनी घेतलेल्या या भूमिकेचे काही शिवसैनिकांनी समर्थन केले आहे तर काहींनी नाराजी व्यक्त केली आहे. इतकच नाही तर ठाणे परिसरात शिंदे यांच्या समर्थनात बॅनरही (banner) झळकले. असाच समर्थनाचा बॅनर कोल्हापुरातही झळकला. मात्र, काही वेळातच तो उतवरण्यात आला.

रंकाळा परिसरात हे बॅनर (banner) झळकले होते. यावर लोकांचा लोकनाथ..एकनाथ. हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदूत्ववादी विचार आत्मसात करणारे आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण पुढे नेणाऱ्या एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देण्यात आल्या होत्या. मात्र या बॅनरवर शुभेच्छुकाचे नाव नव्हते. त्यामुळे हा बॅनर नेमका कोणी लावला याबाबत समजू शकलं नाही.

या बॅनरबाबत शिवसैनिकांनी माहिती होताच जोरदार घोषणाबाजी करत हे बॅनर उतरवण्यात आले. तर आज, कोल्हापुरात उद्धव ठाकरे यांच्या समर्थनात शिवसैनिकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यावेळी एकनाथ शिंदे यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

हेही वाचा :


जान्हवीच्या किलर पोझने नेटकऱ्यांना केलं घायाळ..! (Photos)

Leave a Reply

Your email address will not be published.