आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकरांच्या समर्थनार्थ जयसिंगपुरात कार्यकर्ते रस्त्यावर!

राज्यभर शिंदे गटा विरोधात आंदोलन होत असतानाच जयसिंगपुरात मात्र आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या समर्थनात शक्तिप्रदर्शन सुरु आहे. (maharashtra political news today) राजेंद्र पाटील-यड्रावकर हे शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यांना समर्थन देण्यासाठी आज जयसिंगपूर येथे कार्यकर्ते हातात फलक घेऊन रस्त्यावर रस्त्यावर उतरले आहेत.

आम्ही यड्रावकर अशा टोप्या सर्वांनी घतल्या असून, मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते यड्रावकर यांच्या ऑफिससमोर जमले आहेत. (maharashtra political news today) शिवसेना कार्यकर्ते ही आज राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विरोधात निदर्शने करणार असल्याने याठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

यड्रावकर हे अपक्ष म्हणून निवडून आले आहेत त्यानंतर त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला त्यानंतर ते राज्यमंत्री म्हणून समोर आले. मात्र त्यांनी आता बंडखोर शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतल्याने चर्चेला उधान आले आहे. यड्रावकरांना मानणारा शिरोळ तालुक्यात मोठा गट आहे. तालुक्याच्या विकासासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याची भावना कार्यकर्त्यांनी घेतली आहे.

हेही वाचा :


बंडखोर ४० आमदार ‘मनसे’सोबत जाणार?

Leave a Reply

Your email address will not be published.