थेट दिल्लीवरून CM शिंदे आज येणार कोल्हापुरात!

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्री सरस्वती पाटील यांचे वृद्धापकाळाने कोल्हापुरात निधन झाले. त्या ९१ वर्षाच्या होत्या. त्यांच्या निधनानंतर अनेक नेत्यांनी शोक व्यक्त करत (tribute) श्रद्धांजली वाहिली आहे.
दरम्यान, आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नवी दिल्लीहून कोल्हापूरला येणार आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या आईंचे निधन झाल्याने ते आज कोल्हापूरला येत असल्याची माहिती मिळत आहे. यावेळ त्यांच्यासोबत उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीसही असण्याची शक्यता आहे.
आज दुपारी दोन वाजता मुख्यमंत्री विमानाने कोल्हापूरला येणार आहेत. सायंकाळी ४ वाजता त्यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन होणार आहे. तिथून ते छत्रपती संभाजी पार्क येथील पाटील यांच्या निवासस्थानी पोहोचतील आणि सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास मुख्यमंत्री विमानाने मुंबईकडे रवाना होणार आहेत. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या सांत्वनासाठी ते कोल्हापूरला येत आहेत.
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्री सरस्वती पाटील या कोल्हापुरातील त्यांच्या घरी वास्तव्यास होत्या. (tribute) वृद्धापकाळामुळे त्यांची प्रकृती खाली-वर होत होती. काल त्यांची प्राणज्योत मालवली, ही माहिती चंद्रकांत पाटलांनी फेसबुक पोस्ट करत दिली होती.
हेही वाचा :