हसन मुश्रीफ यांना आयकर विभाग ताब्यात घेण्याची शक्यता!

महाविकास आघाडीतील काही नेत्यांवर भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून लक्ष्य केले जात आहे. राष्ट्रवादीचे अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यानंतर आता शिवसेना नेते अनिल परब, प्रताप सरनाईक यांना किरीट सोमय्या आणि भाजपने घेरले आहे. दरम्यान, किरीट सोमय्यानी नवीन एक ट्विट करत आता ग्रामविकास मंत्री (minister for rural development) हसन मुश्रीफ यांचा नंबर असल्याचे संकेत दिले आहेत. सोमय्या आज (दि. ०१) शुक्रवारी पुण्यात जाणार असून, मुश्रीफ यांच्या विरोधात आयकर विभागाच्या अधिकार्‍यांना भेटणार आहेत.

सोमय्या यांनी ट्विट करत म्हटले आहे की, (minister for rural development) हसन मुश्रीफ कुटुंब आणि सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याविरोधात केंद्र सरकारने पुणे न्यायालयात तक्रार याचिका दाखल केली आहे. त्यात फसवणूक, शेल कॉससाठी कलम ४४७ आणि ४३९ कंपनी कायदा आणि तपास IPC/CRPC कलम २५६ अन्वये कारवाईची विनंती केली आहे. ते पुढे म्हणाले की, पुढच्या काही दिवसांत यावर सुनावणी होणार आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर घोटाळ्याचे आरोप करणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आता पुन्हा एकदा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे मोर्चा वळविला आहे. गेल्या काही महिन्यांपासून किरीट सोमय्या महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर घोटाळ्याचे आरोप करत आहेत. नुकताच त्यांनी दापोली दौरा केला होता.

हसन मुश्रीफ : सोमय्यांची ट्विट करून पुणे दौर्‍याविषयी दिली माहिती
सोमय्या यांनी ट्विट करून आपल्या पुणे दौर्‍याविषयी माहिती दिली आहे. आपण शुक्रवारी पुण्यात जाणार असून, आयकर विभागाच्या अधिकार्‍यांच्या भेटीत १५८ कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणी कागदपत्रे देऊन कारवाईची मागणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यापूर्वी सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांचे साखर कारखाने, तसेच मंत्री म्हणून घेतलेल्या निर्णयांमध्ये घोटाळ्याचे आरोप केले होते.

हेही वाचा :


CSK चा पराभव मोईन अलीच्या त्या एका चुकीमुळे?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *