mountaineer: कोल्हापूरच्या कस्तुरीने केले एव्हरेस्ट सर..!

mountaineer

कोल्हापूरची गिर्यारोहक (mountaineer) कस्तुरी सावेकर हिने शनिवारी (दि. १४ मे) माऊंट एव्हरेस्ट सर केले. कस्तुरी हिने यापूर्वीही एव्हरेस्ट सर करण्याचा प्रयत्न केला होता, पण खराब हवामानामुळे ती मोहीम तिला स्थगित करावी लागली होती. पण त्यानंतर काही महिन्यांतच तिने एव्हरेस्ट सर करत भारताचा तिरंगा जगातील सर्वांत उंच शिखरवार रोवला आहे. कस्तुरीचे वडील दीपक सावेकर यांनीही माहिती दिली.

९ मे रोजी बेस कँपवरून तिच्या या मोहिमेची सुरुवात झाली. आज सकाळी ६च्या सुमारास तिने एव्हरेस्टवर पाऊल ठेवले. छत्रपती
राजर्षी शाहू स्मृती शताब्दी वर्षानिमित्त कस्तुरीने अन्नपूर्णा आणि एव्हरेस्ट ही दोन शिखरं सर केली आहेत, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, उद्गार दीपक सावेकर यांनी काढले.(mountaineer)

mountaineer

कस्तुरीचे वय २० वर्ष इतके आहे, इतक्या लहान वयात तिने गिर्यारोहणात थक्क करणारे यश मिळवले आहे. कस्तुरी लहान असताना वडिलांसोबत सह्याद्रीत विविध ट्रेकसाठी जायची, त्यातूनच तिला गिर्यारोहणाची आवड निर्माण झाली. कस्तुरीचे वडील मेकॅनिक आहेत. कस्तुरीने प्रतिकुल स्थितीत स्वतःला सिद्ध केले आहे.

हेही वाचा :


उन्हाळ्याच्या दिवसांत घरातून बाहेर पडताना ‘या’ तीन गोष्टी कराच!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *