थकीत भाड्यासाठी पालिकेचे २८ गाळे सिल

water bill

नगरपालिकेच्यावतीने घरफाळा, पाणीपट्टी वसुलीची मोहिम तीव्र केली आहे. त्याचबरोबर थकीत भाडे(House tax, water bill) वसुलीपोटी पालिकेच्या कर विभागाने पंचवटी चित्रमंदिर नजीक असलेल्या नगरपालिकेचे तब्बल २८ गाळे सिल केले. तर २४ लाख १४ हजार ५३३ रूपयांची वसुली करण्यात आली. ३१ मार्चच्या पार्श्वभुमीवर पालिकेने वसुलीची मोहिम तीव्र केली असून मिळकतधारकांनी आपला कर वेळेत भरावा, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. प्रदीप ठेंगल यांनी केले आहे.

नगरपालिकेच्यावतीने चालू वर्षाचा तसेच थकीत कर भरण्यासाठी पालिकेच्यावतीने विशेष मोहिम सुरू केली आहे. त्याचबरोबर शहरात विविध ठिकाणी नगरपालिकेच्या मालकीच्या असलेल्या गाळ्यांचे थकीत भाडे(House tax, water bill) वसुली सुरू केली आहे. थकीत भाडे वसुलीला शहरातील गाळे धारकांनी विरोध केला होता. मात्र या संदर्भात मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित गाळे धारकांची बैठक घेऊन थकीत भाडे देण्याच्या सुचना करून भाडे भरण्यासाठी त्यांना ४ हप्ते देऊन मार्च पर्यंत थकीत भाडे भरण्याचे आवाहन केले होते.

मात्र गाळेधारकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभुमीवर आज पालिकेच्या विशेष वसुली पथकाने पंचवटी चित्रमंदिर शेजारी असणाऱ्या तब्बल २८ गाळे थकीत भाड्यापोटी(House tax, water bill) सिल केले आहे. तर २४ लाख १४ हजार ५३३ रूपये वसुल करण्यात आले. आजच्या मोहिमेत उपमुख्याधिकारी केतन गुजर, नगर अभियंता संजय बागडे, कामगार अधिकारी विजय राजापुरे, मिळकत पर्यवेक्षक सचिन पाटील यांचेसह मिळकत विभागाकडील कर्मचारी सहभागी होते.

Smart News:-

युवतीचा विनयभंग युवकावर गुन्हा दाखल


ऊसतोड मजुराच्या अल्पवयीन मुलीवर मुकादमाच्या मुलाचा बलात्कार


राष्ट्रीय लोकन्यायालयात ६०५ प्रकरणे निकाली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *