कोल्हापूर :सुशांत शेलार चित्रपट महामंडळाचे नवे अध्यक्ष, मेघराज राजेभोसलेंची उचलबांगडी!

दीड वर्षांचा खंड आणि विरोधाला विरोधाच्या नाट्यपूर्ण घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बुधवारी झालेल्या अखिल भारतीय (marathi movies) मराठी चित्रपट महामंडळाच्या कार्यकारिणी बैठकीत अभिनेेते सुशांत शेलार यांची महामंडळाच्या अध्यक्षपदी बहुमताने निवड झाली.

यावेळी मागील बैठकीतील इतिवृत्त नामंजूर करून मेघराज राजेभोसले यांची अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली. आणि १४ माजी संचालकांचे सभासदत्व कायम ठेवण्याचा निर्णय झाला.

गेल्या तीन वर्षांपासून चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांची कारकिर्द वादग्रस्त ठरली आहे. त्यातच कार्यकारिणीची मुदत संपून वर्ष झाले तरी त्यांनी बैठक ठेवली नाही, महामंडळाचे कामकाज जवळपास ठप्प होते.(marathi movies)

अखेर कोल्हापूरच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यवाह सुशांत शेलार यांना आपल्या अधिकारात बैठक लावावी अशी विनंती केली होती. संचालक व सभासदांच्या मागणीनंतर बुधवारी हॉटेल केट्रीमध्ये ही बैठक पार पडली. त्यानंतर उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

हेही वाचा :


एकनाथ शिंदे यांची नवी खेळी, शिवसेनेच्या व्हीपला जशास तसे उत्तर!

Leave a Reply

Your email address will not be published.