भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडी एकसंघपणे काम करेल!

Satej Patil meeting today.

भापजला रोखण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्व पक्ष एकसंघपणे काम करतील, ते कोठेही कमी पडणार नाहीत, असा विश्‍वास पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी आज व्यक्त केला. शिवसैनिकांसोबत झालेल्या बैठकीतनंतर (meeting) ते माध्यमांशी बोलत होते. काल राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरासागर (Rajesh Kshirsagar)यांनी महाविकास आघाडीच्या मेळाव्याला गैरहजरी दाखवून नाराजी व्यक्त केल्यानंतर आज पालकमंत्री पाटील यांनी शिवसैनिकांची बैठक घेवून त्यांना विश्‍वासात घेतले. निवडणुकीचे नियोजन, व्युहरचनेबाबत बैठकीच चर्चा झाली. यावेळी खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik), जिल्हाप्रमुख विजय देवणे (Vijay Devane) यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, निश्‍चितपणे शिवसेनेची काही नाराजी होती. राजेश क्षीरसागर यांनी मेळावा(meeting)घेवून ती जाहीर केली. मात्र आम्हाला खात्री आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत ती नाराजी दूर होईल. आणि एकसंघपणे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष काम करतील.

भाजपला रोखण्यासाठी ते कोठेही कमी पडणार नाहीत, याचा विश्‍वास निश्‍चितच आम्हाला आहे. ही लढाई महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असणार आहे. एका बाजूला सत्य महाविकास आघाडीचे आणि एका बाजूला भाजपचे खोटं अशा संघर्षाची ही लढाई असणार आहे. गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कोविड असेल, महापूर असेल सर्व ठिकाणी सरकारने केलेले काम असेल, पन्नास हजार रुपयांची कर्ज माफी असेल त्याच जोरावर आम्ही निवडणूक निश्‍चितपणे जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Satej Patil meeting today.

खासदार संजय मंडलिक म्हणाले, कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पालकमंत्री पाटील आणि शहरातील शिवसैनिकांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. येथे शिवसेनेचा अजेंडा पाळण्यावर चर्चा झाली. ज्यामध्ये शिवसेनेत जो आदेश मातोश्रीवरून येतो तो तंतोतंत पाळला जातो. तशी प्रथा शिवसेनेत आहे. खदखद वगैरे जी होती ती उमेदवारी पर्यंत ठिक होती. आता खदखदीपलीकडे जावून निवडणुकीचे नियोजन आणि त्या संदर्भात काय करावे लागेल. याची नेमकी व्युहरचना काय आहे याची चर्चा बैठकीत झाली. ताकदीने प्रचार करणे आणि भाजपला रोखणे हा आमच्या सर्वांचा अजेंड आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रित लढायचे हा ठाम निर्धार आजच्या बैठकीत घेतला आहे.

बैठकीस शहर प्रमुख शिवाजी जाधव, माजी आमदार सुरेश साळोखे, माजी शहर प्रमुख रविकिरण इंगवले, सुजित चव्हाण, शुभांगी पोवार यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा :


तर 30 वर्षांनंतर तुमच्या मुलींनाही हिजाब घालावा लागेल..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *