कोल्हापुरातील पंचगंगेत एकही मूर्ती विसर्जित नाही

तब्बल 28 तास… डाॅल्बीचा अखंड दणदणाट…. झगमगणारी लेझर लाईट आणि 30 तासांच्या (ganesh god) पोलिस बंदोबस्तात कोल्हापूरमधील विसर्जन मिरवणूक पार पडली. ही मिरवणूक पाहण्यासाठी अलोट जनसागर लोटला होता. त्यामुळे मुख्य मार्गावर अनेकवेळा चेंगराचेंगरी, मंडळ आणि तालमींची खुन्नस दिसून आली.

पोलिसांकडून मंडळांविरोधात कोणतीही ठाम भूमिका न घेतल्याने डाॅल्बीचा (ganesh god) अखंड दणदणाट झाला. मध्यरात्री डाॅल्बी बंद करण्यात आल्यानंतर कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच झोपत दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता पुन्हा सुरु केला आणि मिरवणूक पुन्हा सुरु झाली. दुसरीकडे शिवाजी चौकातील महागणपणीचेही उत्साहात विसर्जन करण्यात आले.

पंचगंगेत एकाही मूर्तीचे विसर्जन नाही, पालिकेची यंत्रणा अखंड कार्यरत
मनपा प्रशासनाकडून घरगुती व सार्वजनिक मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव पर्यावरण पूरक करावा असे आवाहन करण्यात आले होते. यासाठी शहरात ठिकठिकाणी महापालिकेच्या वतीने कृत्रिम विसर्जन कुंड ठेवण्यात आले होते. या उपक्रमाला कोल्हापूरकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सार्वजनिक विसर्जन मिरवणुकीवेळी सार्वजनिक मंडळांनी 161 गणेश मूर्ती या कृत्रिम विसर्जन कुंडाच्या ठिकाणी अर्पण केल्या. महापालिकेच्या मूर्ती अर्पण आवाहनास सार्वजनिक मंडळांनी प्रतिसाद देत 161 मूर्ती पर्यावरणपूरक अर्पण केल्या, तर 920 गणेश मुर्ती सार्वजनिक मंडळांनी स्वत: विसर्जित केल्या. पंचगंगेत एकही मूर्ती विसर्जित झाली नाही.

महापालिकेला अर्पण केलेल्या व सार्वजनिक मंडळांनी विसर्जित केलेल्या अशा 1081 गणेश मुर्ती इराणी खाणीमध्ये विसर्जित करण्यात आल्या. विसर्जन मिरवणूक शांततेने पार पाडल्याबद्दल सर्व सार्वजनिक मंडळांच्या अध्यक्ष, प्रतिनिधींचे प्रशासक डॉ कादंबरी बलकवडे यांनी आभार व्यक्त केले.

Smart News :