दीपक केसरकर यांनी शिक्षण सेवकांच्या मानधनाबाबत केली ग्वाही!

गेली अनेक वर्षे शिक्षण सेवकांच्या(political news today) मानधनाचा प्रश्‍न रेंगाळला आहे. सद्य:स्थितीत त्यांना ५ ते ६ हजार रुपये असे तुटपुंजे मानधन मिळते. मात्र, त्यांचा प्रश्‍न सुटावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून, मानधनाचा आकडा १२ ते १५ हजारांपर्यंत होण्यासाठी मी निश्‍चितच प्रयत्न करीन, असा शब्द शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिला. केंद्रप्रमुखांची रिक्त असलेली पदे भरण्यासाठी लवकरच शासन धोरण ठरवले जाईल, अशीही घोषणा त्यांनी केली.

येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्री. केसरकर बोलत होते. ते पुढे म्हणाले, ‘भरती होणाऱ्‍या शिक्षकांनी (political news today)तत्काळ बदलीसाठी आग्रह धरू नये. जोपर्यंत येथील मुलांची पर्यायी व्यवस्था होत नाही, तोपर्यंत धीर धरणे गरजेचे आहे.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, काही तांत्रिक गोष्टी अडचणीच्या ठरत असल्यामुळे हा प्रश्‍न रेंगाळला आहे. येत्या काळात त्यासाठी आवश्यक असलेला केंद्राकडे पाठपुरावा निश्‍चितच करण्यात येईल.’ भरती झालेले अन्य जिल्ह्यातील शिक्षक भरती नंतर पुन्हा आपल्या जिल्ह्यात जाण्यासाठी प्रयत्न करतात. हा धागा पकडून श्री. केसरकर यांनी शिक्षकांना आवाहन केले. बदली करून घेणे तुमचा हक्क आहे. परंतु, ज्या जिल्ह्यात भरती झाली, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपण ज्ञानदान करणे गरजेचे आहे. त्यासाठी तत्काळ बदलीचा आग्रह न धरता थोडा धीर धरावा, आम्ही निश्‍चितच तुमच्या मागण्या पूर्ण करू, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा :