‘कोल्हापूर उत्तरसाठी शिवसेनेच्या जागेबाबत पुन्हा चर्चा’

politics news today – कोल्हापूर जिल्ह्यातील उत्तर विधानसभेची पोटनिवडणूक लागली आहे. ही जागा काँग्रेसला गेल्याने शिवसैनिक नाराज झाले यावर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सुचक वक्तव्य केले आहे. नागपुरमध्ये संजय राऊत यांनी प्रेस क्लबमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
कोल्हापूर उत्तर जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे शिवसैनिक नाराज असल्याची चर्चा आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीचा विचार करता ज्या जागा आमच्या पक्षाकडे नाही त्याठिकाणी संघटनात्मक बांधणी करून निवडणूक लढवण्याचा आमचा मानस आहे. (politics news today)
कोल्हापूरची जागा अनेक वर्ष शिवसेना लढत आहे आणि जिंकत आहे. परंतू २०१९ ला शिवसेना-भाजपा युती असताना शिवसेनेचे राजेश क्षिरसागर पराभूत झाले. काँग्रेसचा उमेदवार जिंकून आला. त्यामुळे पोटनिवडणुकीत ही जागा काँग्रेसला दिली आहे. २०२४ च्या निवडणुकीत या जागेबाबत पुन्हा चर्चा होईल असं सांगत सूचक विधान केले आहे.
हेही वाचा :