शिवसेना संपवणारे संपले; हे सुद्धा थोड्या ‘महिन्यातच’ संपतील

शिवसैनिकच नाही तर सामान्य लोकं हळहळले.चांगल्या माणसाची कशी फसवणूक केली गेली हे पाहिलं. गलिच्छ राजकारण यांनी केलं. उद्धव ठाकरे आजारी होते तेव्हा शिवसैनिकांनी प्रार्थना केल्या. (politics update today) मात्र ज्या पद्धतीने यांनी षडयंत्र रचलं त्याचा राग ठाकरेंनी व्यक्त केला.आईचं दूध विकण्याचं पाप या लोकांनी केलं अस वक्तव्य संजय पवार यांनी व्यक्त केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत सत्ताधाऱ्यांवर तसेच बंडखोरांवर निशाणा साधला. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधानं आलं. या संदर्भात त्यांनी प्रतीक्रिया दिली.

कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, शिवसेना संपवणारे संपले. हे सुद्धा थोड्या वर्षात नाही तर थोड्या महिन्यातच संपतील. भाजपचा डाव साध्य होईल तेव्हा मानसन्मान निघून जाईल तेव्हाच शिवसेनेची आठवण येईल. राजकारणात दुसऱ्यांनी फसवलं असतं तर मान्य होतं. ज्यांना मोठं केलं त्या घरभेदींनीच घात केला. (politics update today) आतापर्यंत आमदार खासदार झालेल्यांना पॉलिटिकल बॅकग्राऊंड नव्हता. सर्वसामान्य कार्यकर्ताच मोठा करायचा हे ठाकरेंनी ठरवलय.मात्र यांनी विश्वासघात केला. बाकावर पुढे बसणारे येत्या काळात मागे बसतील मग त्यांना कळेल भाजप काय आहे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.

पुढे बोलताना ते म्हणाले, माझ्या बापाचं नाव वापरू नका म्हणणं चुकीचं नाही. त्यांच्या नावाने मतांचा जोगवा कशाला मागताय. उद्धव ठाकरे यांचे फोटो होर्डिंग वरून काढले हे दुर्दैव. हे नीच कृत्य यांनी केलं. उद्धव ठाकरे शिवसैनिकांच्या हृदयात आहेत. विरोधी गटाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. खोट बोल पण रेटून बोल अशी त्यांची अवस्था.

दिल्लीश्वर नाराज होतील म्हणून त्यांना बोलावं लागतंय. संजय मंडलिक यांच्यासाठी सामान्य शिवसैनिकांनी काम केलं. त्यांचं हे वक्तव्य चुकीचं आहे. उमेदवारी हवी होती तेव्हा संजय पवारला 10 फोन करत होता. मंडलिक यांनी आता प्रशासकीय यंत्रणेलाच घेऊन निवडणूक लढवावी. खासदार मंडलिक यांच्या ही घरावर लवकरच जाऊन जाब विचारणार असल्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला.

हेही वाचा :


राज्‍यसभेत गदारोळ, १९ खासदार आठवडाभरासाठी निलंबित

Leave a Reply

Your email address will not be published.